शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

पुणे जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांची धुराडी झाली थंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 1:14 AM

पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. १५ साखर कारखान्यांपैकी ११ कारखान्यांची धुराडी बंद होऊन ‘पट्टा’ पडला आहे.

सोमेश्वरनगर  - पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. १५ साखर कारखान्यांपैकी ११ कारखान्यांची धुराडी बंद होऊन ‘पट्टा’ पडला आहे. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी १ लाख टन उसाचे गाळप करून १ कोटी १४ लाख क्विंटल साखरपोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तर नेहमीप्रमाणेच १२, ११ चा सरासरी साखरउतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने साखरउताऱ्यात बाजी मारली आहे.यावर्षी जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांपेक्षा ऊसगाळपात खाजगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी याही वर्षी साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र होते. तर दुसरीकडे सोमेश्वर, माळेगाव, विघ्नहर आणि भीमाशंकर अशा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अजूनही मोठ्या प्रमाणावर शिल्लक उसाचे क्षेत्र आहे. या कारखान्यांना आपल्या कारखान्यातील ऊस संपविण्यासाठी १५ एप्रिल उजाडण्याची चिन्हे आहेत. चालू हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हुमणीचा प्रादूर्भाव आणि पाण्याची कमतरता या कारखान्यांमुळे अनेक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाचे टनेज घटल्या कारणांमुळे हंगाम लवकर उरकले आहेत. चालू हंगामात मार्च महिन्यातच कारखान्यांनी ऊसगाळपाचा आणि साखर पोत्यांचा कोटीचा टप्पा मार्च महिन्यातच पार केला आहे. सर्व कारखाने बंद होण्यासाठी ऊस उत्पादकांना एक महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.जिल्ह्यातील भीमा पाटस, कर्मयोगी, नीरा भीमा, दौंड शुगर, छत्रपती, घोडगंगा, अनुराज शुगर, संत तुकाराम, राजगड, श्रीनाथ म्हस्कोबा, बारामती अ‍ॅग्रो या ११ कारखान्यांनी आपल्या हंगामाची सांगता केली आहे. उसाचे गाळप संपवित कारखान्यांची धुराडी बंद केली आहेत. सोमेश्वर, माळेगाव, विघ्नहर, भीमाशंकर हे चार कारखाने उशिरापर्यंत चालू राहण्याची चिन्हे आहेत. अनेक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील यावर्षी ऊस उत्पादकांचे उसाचे पीक उशिरा तुटल्याने गहू अथवा इतर तत्सम पिके शेतकऱ्यांना घेता आली नाहीत. त्यामुळे टनेज घटून ऊस उत्पादाकांना अर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. अडसाली ऊस संपविण्यासाठी कारखान्यांना फेबु्रवारी महिना होता. त्यामुळे जिल्ह्यातील पूर्ण ऊस संपण्यासाठी कारखान्याना अजून एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. केंद्र सरकारने साखर कारखान्यांच्या साखरेला ३१ रुपये दिल्याने साखर कारखानदारीला सुगीचे दिवस आले आहेत. तर दुसरीकडे साखर कारखान्यांनी व्याजासह एफआरपी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. त्यामुळे अनेक कारखान्यांनी गेल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना एफआरपी अदा केली आहे. तर काही दिवसांतच कारखाने व्याजासह संपूर्ण एफआरपी अदा करणार आहेत. त्यामुळे अनेक कारखान्यांना एफआरपीसाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.चालू हंगाम उशिरा सुरू झाल्याने थंडीचे प्रमाण चांगले असल्याने उसाचा गोडवा वाढला होता. त्यामुळे अनेक साखर कारखान्याना वाढलेल्या साखर उताºयाचा चांगलाच फायदा झाला आहे तर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचा साखर उताºयात अनेक दिवस साडेअकराच्या आतच घुटमळत आहेत. अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर बारा वर गेले होते. मात्र, या हंगामात थंडीचेप्रमाण चांगले असूनही म्हणावा तेवढा साखर कारखान्यांनासाखर उतारा मिळत नाही.जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ११ टक्के वरच घुटमळत राहिला. १२.११ टक्के साखर उतारा मिळवित सोमेश्वर कारखाना जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. ११.८० चा साखर उतारा मिळवित भीमाशंकर दुसºया तर ११.११.६२ चा साखर उतारा मिळवित माळेगाव तिसºया स्थानावर आहे.सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी १ लाख ४६ हजार ७९० में. टन ऊसाचे गाळप करून १ कोटी १४ लाख १६ हजार ७२० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.इंदापूर कारखान्याने १० लाख ४८ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ११ लाख ८७ हजार क्विंटल पोत्याचे उत्पादन घेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने १० लाख ३४ हजार मे. टन ऊसाचे गाळप करून ११ लाख ९९ हजार क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेत दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर दौंड शुगर कारखान्याने ९ लाख ६१ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ८६ हजार पोत्यांचे उत्पादन घेत तिसरा क्रमांक पटकाविला. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे