केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित इ. ८ वीसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) ही परीक्षा घेतली जाते, ही परीक्षा चालू शैक्षणिक वर्षात ६ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात आली. यात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती सलग चार वर्षे मिळणार आहे. या परीक्षेत स्वा.से.कै.शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालयाचे २३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या २३ विद्यार्थ्यांना एकूण ११ लाख ४ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. विशेषता आजपर्यंत या विद्यालयातील एकूण २३५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्राचार्य सूर्यभान बर्वे, मोहन बोराटे, कल्याण कडेकर, राजू घोडके, अतुल गोडे यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सोपानराव धुमाळ, उपाध्यक्ष शहाजी धुमाळ, शांताराम गायकवाड, सचिव एकनाथराव झेंडे, आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन केले.
एनएमएमएस शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी
हर्षदा राजेंद्र शितोळे, हर्षद रंगनाथ जाधव, हर्षदा सुनील नवगिरे, गुरुदत्त माऊली धुमाळ, ओम गणेश धुमाळ, आर्यन विजय आरेकर, वैष्णवी अण्णासाहेब धुमाळ, सात्विक बाळासाहेब दाते, जय गणेश धुमाळ, सिद्धांत अनिल जाधव, अंजली संदीप शितोळे, ज्ञानेश्वरी अजय आरेकर, काजल मारुती राऊत, दर्शन लालासाहेब मोरे, संस्कार विठ्ठल खैरे, अमित अजित पानसरे, गौरी मदन धुमाळ, अजय युवराज झेंडे, वैभवी ईश्वर लोखंडे, अद्वय शांताराम मोकळ, कीर्ती गंगाधर पठाडे, मोहिनी भाऊसाहेब गुळवे, शशिकांत गोविंद झेंडे.
२५ तळेगाव ढमढेरे विद्यार्थी.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त झालेले विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक.
250821\screenshot_20210825_163714.jpg
राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक