लासुर्णे : येथील पाटीलवस्ती शाळेत विद्यार्थ्यांनी परिसरातील टाकाऊ वस्तंूपासून राख्या बनवल्या. त्या शाळेतील मुलांना बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला. अनोख्या उपक्रमाबाबत पालकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. मुलांनी पारंपरिक कपडे परिधान केले होते. मुलांना सण व त्याचे महत्त्व समजावे, म्हणून अशा उपक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापक दिलीप काळे यांनी सांगितले.
स्वत: राख्या तयार केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तसेच मुलींनी राख्या बांधल्यावर मुलांनीही त्यांना शालोपयोगी वस्तू भेट दिल्या. यामुळे खºया अर्थाने मुलांना सणाचे व निसर्गाचे तसेच बहीण-भावाचे अतूट नाते समजले. पालकवर्गातून या उपक्रमाबद्दल शाळेचे कौतुक होत आहे. या उपक्रमाला शाळेतील शिक्षिका अलमास खान, अर्चना कुंभार, पल्लवी गवळी, राजश्री सुतार, ज्योती लांडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.