पुणे : शिक्षण मंडळाकडून खरेदीत होणारी ‘शाळा’ पुन्हा एकदा उजेडात आली आहे. पालिका शाळांमधील चौथी आणि सातवीच्या मुलांसाठी खरेदी करण्यात आलेल्या उर्दू, मराठी, तसेच इंग्रजी माध्यमांच्या पुस्तक खरेदीत पालिका प्रशासनाने तब्बल ४९ लाख ८८ हजार रुपयांची बचत केली आहे. शिक्षण मंडळाने याच खरेदीसाठी ७३ लाख ४९ हजार रुपयांचा प्रस्ताव ठेवला होता. अर्धा कोटी रुपये वाचले असले, तरी खरेदीला दिरंगाई झाल्याने ही पुस्तके मुलांना शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांत मिळणार आहेत. राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यानुसार, शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकार पालिकेस दिले आहेत. त्यात आर्थिक खरेदीचे अधिकारही देण्यात आले आहे. मागील वर्षी सप्टेंबर २०१४ मध्ये हे अधिकार पालिकेस देण्यात आले आहेत. यापूर्वी आॅगस्ट २०१४ मध्ये शिक्षण मंडळाने चौथी, तसेच सातवीच्या मुलांसाठी उर्दू, मराठी आणि इंग्रजी माध्यमांची पुस्तके करण्यासाठीचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार ही पुस्तके १० टक्के सवलतीच्या दरात खरेदीचा होता. या खरेदीसाठी ७३ लाख ४९ हजारांचा खर्च येणार होता. मात्र, पालिकेने मंडळाच्या ठरावानुसार, या खरेदीसाठी खरेदी समिती नेमण्यात आली. त्यात विक्रेत्यांकडून थेट दर मागवून हीच पुस्तके २४ लाख ६३ हजार रुपयांमध्ये खरेदी केली आहेत. (प्रतिनिधी)असे वाचले ४९ लाख माध्यमशिक्षण मंडळाचा खरेदीदरमहापालिकेची प्रत्यक्ष खरेदीपालिकेस झालेला फायदा उर्दू९ लाख ९९ हजार ४४३२ लाख ४२ हजार ३९५७ लाख ५७ हजार ४८ रूपये इंग्रजी१८ लाख ७० हजार ८००५ लाख ६९ हजार१३ लाख १ हजार ८०० रूपयेमराठी४५ लाख २८ हजार १५०१६ लाख ५२ हजार ७००२९ लाख २९ हजार ४५० रूपये४महापालिकेस आर्थिक अधिकार देण्यात आल्यामुळे शिक्षण मंडळातील भ्रष्टाचाराचे कुरण बंद पडत असले, तरी पालिका प्रशासनाकडून करण्यात येणारी ही खरेदी वेळेत होत नसल्याने त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. ४या वर्षी पालिकेकडून गणवेश, पुस्तके, वह्या , स्वेटर खरेदी करण्यात आले. मात्र, या वस्तू हे शैक्षणिक वर्ष संपण्यात अवघे दोन महिने उरले असताना, मुलांच्या हातात पडत आहेत. ४त्यामुळे हा खर्च करूनही त्याची हवी तेवढी उपयुक्तता विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने पालक तसेच मुलांमध्येही नाराजी आहे. त्यामुळे या खरेदीसाठी स्वतंत्र यंत्रणा राबवून ही खरेदी वेळेत होण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी केली जात आहे.
शिक्षण मंडळाची पुस्तक खरेदीची ‘शाळा’
By admin | Published: February 07, 2015 11:55 PM