शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

नीरावागजमध्ये सहाव्या दिवशीही शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 8:51 PM

ग्रामस्थांकडून आंदोलनाचा भाग म्हणून उद्या गुरुवारी शाळेच्या प्रवेशद्वारावर शेळ्या-मेंढ्या सोडून बारामती-नीरावागज रस्ता रोखणार आहेत.

ठळक मुद्देशिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलनाचे सत्र सुरू

बारामती : शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी नीरावागज येथील ग्रामस्थांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच राहिल्याने डोंबाळे, मदनेवस्ती येथील शाळा आजही बंद राहिली. ग्रामस्थांनी आज थाळीनाद आंदोलन केले. उद्या गुरुवारी शाळेच्या प्रवेशद्वारावर शेळ्या-मेंढ्या सोडून बारामती-नीरावागज रस्ता रोखणार आहेत. शुक्रवार, दि. १५  शाळेच्या पहिल्या दिवसापासून ग्रामस्थांचे आंदोलन सुरू आहे. ‘आमचे शिक्षक नसतील, तर शाळाच नको’ अशा घोषणा पालकांनी या वेळी  दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासोा डोंबाळे, विठ्ठलराव देवकाते, सुधीर देवकाते, पोपटराव देवकाते, सुनील गावडे, सुरेश कोकरे, संग्राम मदने, बाळासाहेब देवकाते, अप्पासाहेब देवकाते आदी पालकांनी आंदोलनात  सहभाग घेतला. गावात संतोष गावडे, आबासाहेब कदम या दोघा शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलनाचे सत्र सुरू ठेवले आहे. सुधीर देवकाते यांनी ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले की, उद्या शाळेच्या प्रवेशद्वारावर शेळ्या-मेंढ्या बांधून बारामती-नीरावागज रस्ता रोखण्यात येणार आहे. तुम्ही आॅर्डर घेतल्याशिवाय इकडं यायचं नाही’४येथील बदली झालेले शिक्षक संतोष गावडे यांनी पहिल्याच दिवशी ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली. त्यावर मात्र ग्रामस्थांनी गुरुजी तुम्ही इकडं फिरकू नका. आता तुम्ही आॅर्डर घेतल्याशिवाय इकडं यायच नाही,’ असे सांगितले. ............आमचं शिक्षक एकच नंबर!४आमचं शिक्षक एकच नंबर आहेत! पोरं इंग्लिश फडाफडा बोलत्याती, गणितसुदिक भारी सोडवत्यात, मोठ्या पोरांसारख फरडा इंग्लिश लिव्हत्यात. त्यामुळे गावडेगुरुजी राहिलं तर आणखी अ‍ॅडमिशन होणार आहेत. नाहीतर आम्ही दाखलं काढणारच, असे विठ्ठलराव देवकाते यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीStudentविद्यार्थीTeacherशिक्षकonlineऑनलाइनTransferबदली