खेडच्या पश्चिम भागातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अॅड. राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालय-वाडा, सरस्वती विद्यालय-औदर, शिवाजी विद्यालय- डेहणे, माध्यमिक विद्यालय-वाशेरे, भामचंद्र विद्यालय-भांबोली, माध्यमिक विद्यालय- सायगाव या शाळा सुरू झाल्या आहेत. तर अनेक गावांत कोविड पेशंट सापडत असल्याने त्याठिकाणी शाळा सुरू करता आल्या नाहीत. विद्यार्थी व शिक्षकांची शाळा सुरू करण्याची इच्छा असूनही शाळा सुरू करता आल्या नाहीत. काही शाळांमध्ये प्राथमिक शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांना जवळ बसवून त्यांच्याकडून अभ्यासाचे धडे पूर्ण करून घेत आहेत. शाळा सुरू करण्यासाठी ८ वी ते १२ वी पर्यंत परवानगी मिळाली असली तरी विद्यार्थ्यांनी शाळेत आलेच पाहिजे, असी सक्ती नाही. त्यामुळे वर्ग उपस्थिती कमी असते. कोविडचे नियम पाळून व संबंधितांची परवानगी घेऊन काही शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्ट करणे आणि लसीकरण करणे बंधनकारक आहे.
शाळेत उपस्थित असणारे विद्यार्थी व शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करताना.