शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

शिक्षकांसाठी ग्रामस्थांकडून शाळेला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 2:29 AM

बारामती तालुक्यातील नीरावागज परिसरात डोंबाळे मदनेवस्ती जिल्हा परिषद शाळेला पहिल्याच दिवशी शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी टाळे ठोकले. नीरा वागज गाव जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांचे गाव आहे.

बारामती - बारामती तालुक्यातील नीरावागज परिसरात डोंबाळे मदनेवस्ती जिल्हा परिषद शाळेला पहिल्याच दिवशी शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी टाळे ठोकले. नीरा वागज गाव जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांचे गाव आहे. अध्यक्ष देवकाते यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांऐवजी पालकांनीच उपस्थिती दर्शवून प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. तर रुजू होऊ न दिल्याने नवीन शिक्षक झाडाखाली बसून होते.सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात गावात संतोष गावडे, आबासाहेब कदम हे दोन शिक्षक रुजू झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहभागातून जिल्हा परिषद शाळेचा, येथील विद्यार्थ्यांचा कायापालट केला आहे. या दोघा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे येथील विद्यार्थी कोणताही प्रश्न चुटकीसरशी सोडवितात. गणिती आकडे सहज सोडवितात. सर्वच विषयांमध्ये विद्यार्थ्यांची हुशारी कमालीची वाढली आहे, असा ग्रामस्थांचा दावा आहे.२०१६-१७ साली शाळेचा पट केवळ १८ होता. मात्र, शाळेतील भौतिक सुविधा, शाळेचा परिसर, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास, पालकांमध्ये शिक्षणाविषयी केलेली जागृतीमुुुळे हे चित्र बदलले.शिक्षकांनी घेतलेल्या पुढाकारातून आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना लोकसहभागातून २० ते २५ लाख रुपये गोळा केले. त्यातून सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा उभारली. भिंतीना चित्रांच्या, संदेशाच्या माध्यमातून बोलते केले आहे.सन २०१७- १८साली ही शाळा पंचायत समिती चषक विजेती ठरली. पुणे शहरापाठोपाठ बारामतीची शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख होऊ पाहत आहे. मात्र, बारामती शहरातून या शाळेत २५ विद्यार्थी एसटी बसने प्रवाश करुन शाळेत येतात. शाळेत पूर्वप्राथमिक वर्ग सुरु करण्यात आला. या वर्गासाठी गावातील नयना बुरुंगले यांना ग्रामस्थांनी नियुक्त केले आहे. येथील प्रगतिशील शेतकरी सुधीर देवकाते यांनी त्यांच्या खिशातील १ लाख ६८ हजार रुपये बुरुंगले यांच्या वेतनापोटी खर्च केले आहेत. हा वर्ग जिल्हा परिषद शाळेचा आत्मा बनला. आज या वर्गामध्ये ३० विद्यार्थी प्रवेश नोंदी झाल्या आहेत. आज १ली, ४थीच्या शाळाप्रवेशासाठी १५० विद्यार्थ्यांची यादी आहे.मात्र, २०१८-१९ या वर्षाच्या सुरवातीला शासन निर्णयानुसार दोन्ही शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश आले. त्यानंतर सुवर्णा आडके, श्रीपाद देशपांडे यांच्यासह इनामदार (पूर्ण नाव माहीत नाही) हे शिक्षक नव्याने रुजू होण्यासाठी आले. त्यांना रुजू होऊ न दिल्याने ते आज दिवसभर झाडाखाली बसून होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकासोा डोंबाळे, सुरेश कोकरे, सुनील गावडे, सुधीर देवकाते, विठ्ठल देवकाते, रणजित देवकाते, पोपट सुळ, संतोष सुळ, पांडुरंग भोसले, अमोल डोंबाळे, बाळासोा कुंभार, गणेश मदने, बाळासोा देवकाते, पोपट देवकाते, रामदास देवकाते, महेश गावडे आदी पालक उपस्थित होते....आमचे शिक्षक नसतील, तर शाळाच नकोशाळेतील शिक्षकांची आॅनलाईन झालेली बदली रद्द करण्यासाठी नीरावागज ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आहेत. आमचे शिक्षक नसतील , तर शाळाच नको. रद्द करा, रद्द करा आॅनलाईन बदली रद्द करा, उपक्रमशील शाळेला बदलीतून सूट मिळालीच पाहिजे, आॅनलाईन बदली रद्द झालीच पाहिजे, आदी मागण्यांचे फलक पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर लावले आहेत. पालकांनी या घोषणादेखील दिल्या आहेत....खिशातील १ लाख ६८ हजार रुपये केले वेतनापोटी खर्चशाळेत पूर्वप्राथमिक वर्ग सुरु करण्यात आला आहे. या वर्गासाठी गावातील नयना बुरुंगले यांना ग्रामस्थांनी नियुक्त केले आहे.येथील प्रगतिशील शेतकरी सुधीर देवकाते यांनी त्यांच्या खिशातील १ लाख ६८ हजार रुपये बुरुंगले यांच्या वेतनापोटी खर्च केले आहेत.हा वर्ग जिल्हा परिषद शाळेचा आत्मा बनला. आज या वर्गामध्ये ३० विद्यार्थी प्रवेश नोंदी झाल्या आहेत. आज १ ली, ४ थीच्या शाळाप्रवेशासाठी १५० विद्यार्थ्यांची यादी आहे....तर सामूहिकरीत्या १०० विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले द्याशिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी कमिटी अध्यक्ष काकासोा डोंबाळे, उपाध्यक्ष सुनील गावडे, सर्व सदस्यांनी एक मुखी ठराव केला. जर दोन्ही शिक्षकांची बदली रद्द होउन शासन जोपर्यंत लेखी आदेश देणार नाही, तोपर्यंत शाळा बंद ठेवणार. आलेले तिन्ही शिक्षक रुजू करुन घ्यायचे नाहीत.शिक्षकांची बदली रद्द न झाल्यास सामूहिकरीत्या १०० विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले शासनाने द्यावेत. त्यानंतरच शाळा सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र