अजून एक आठवडा तरी पुण्यातील शाळा, महाविद्यालय सुरू होणार नाहीत - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 12:47 PM2022-01-22T12:47:04+5:302022-01-22T13:00:20+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने निर्णय
पुणे: शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यामुळे एक आठवडा तरी पुण्यातील शाळा, महाविद्यालय सुरू होणार नाहीत, असं अजित पवार म्हणाले. काल एकाच दिवशी जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीने उच्चांक केला आहे. अजित पवार काय म्हणाले-
- सर्वांना विचारात घेऊन सर्व निर्णय
- कोरोना आपल्यात वाढू नये यासाठीच निर्णय
- ७३ हजार ऍक्टिव्ह रुग्ण, कालची एका दिवसातील आकडेवारी १६ हजार
- अजून किमान आठ दिवस तरी पुण्यात लाट कमी होणार नाही, की अजून वाढतेय
- पुण्याचा कोरोना दर २७ टक्के
- अजून एक आठवडा तरी पुण्यातील शाळा महाविद्यालय सुरू होणार नाहीत
- कोरोना संख्या वाढत असले तरी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. सर्व बेड आहेत पण रुग्ण ऍडमिट नाहीत, सगळे हॉस्पिटलमध्ये बेड खाली आहेत, रुग्णांना त्रास होऊ देणार नाही.
- खाजगी हॉस्पिटलच्या तक्रार येत आहेत
पुणे शहरातील शाळा बंद राहतील असं ट्विटही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2022
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
शहरातील जलतरण तलाव सुरू राहतील अशी माहिती महापौरांनी दिली आहे.
जलतरण तलाव सुरु !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2022
पुणे शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला असून दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.
शहरातील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू राहतील- महापौर मुरलीधर मोहोळ
उद्याने सकाळच्या सत्रात सुरु राहणार !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2022
पुणे मनपा हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.