पुणे: शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यामुळे एक आठवडा तरी पुण्यातील शाळा, महाविद्यालय सुरू होणार नाहीत, असं अजित पवार म्हणाले. काल एकाच दिवशी जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीने उच्चांक केला आहे. अजित पवार काय म्हणाले-
- सर्वांना विचारात घेऊन सर्व निर्णय- कोरोना आपल्यात वाढू नये यासाठीच निर्णय- ७३ हजार ऍक्टिव्ह रुग्ण, कालची एका दिवसातील आकडेवारी १६ हजार- अजून किमान आठ दिवस तरी पुण्यात लाट कमी होणार नाही, की अजून वाढतेय- पुण्याचा कोरोना दर २७ टक्के - अजून एक आठवडा तरी पुण्यातील शाळा महाविद्यालय सुरू होणार नाहीत- कोरोना संख्या वाढत असले तरी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्यांची संख्या कमी आहे. सर्व बेड आहेत पण रुग्ण ऍडमिट नाहीत, सगळे हॉस्पिटलमध्ये बेड खाली आहेत, रुग्णांना त्रास होऊ देणार नाही.- खाजगी हॉस्पिटलच्या तक्रार येत आहेत
पुणे शहरातील शाळा बंद राहतील असं ट्विटही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
शहरातील जलतरण तलाव सुरू राहतील अशी माहिती महापौरांनी दिली आहे.
शहरातील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू राहतील- महापौर मुरलीधर मोहोळ