शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

‘भारत बंद’मुळे शाळांचा उडाला गोंधळ, काही बंद, तर काही ठिकाणी लवकर सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 1:10 AM

विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंददरम्यान शाळांना सुट्टी द्यायची की शाळा सुरू ठेवायच्या यावरून शाळांमध्ये गोंधळ उडाला.

पुणे : विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंददरम्यान शाळांना सुट्टी द्यायची की शाळा सुरू ठेवायच्या यावरून शाळांमध्ये गोंधळ उडाला. काही शाळांनी सुट्ट्या दिल्या तर काहींनी सोमवारी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र सकाळी एका शाळेच्या स्कूलबसवर दगडफेक झाल्याचे समजताच अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आले.रविवारी सायंकाळी भारत बंद राहणार असल्याच्या बातम्या दाखविल्या जाऊ लागल्या. त्या वेळी सोमवारी शाळा सुरू राहणार आहे का याची विचारणा अनेक पालकांनी शाळांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून शिक्षकांकडे केली होती. मात्र अनेक शाळा प्रशासनांनी शाळा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेला पाठविले. मात्र सकाळी बंदची तीव्रता वाढू लागल्यानंतर अर्ध्यातूनच शाळा सोडण्यात आल्या, त्यामुळे विद्यार्थी व पालकांची मोठी गैरसोय झाली. अनेक ठिकाणी स्कूलबस न आल्याने विद्यार्थी शाळेला जाऊ शकले नाहीत, त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.सायंकाळी सहानंतर बंद मागे घेतला जाणार असल्याने स्प्रिंगडेल शाळेने मुलांना सायंकाळी सहानंतर घरी पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्व पालकांना फोन वमेसेज करून आपल्या पाल्यांना संध्याकाळी सहानंतर सोडण्यातयेईल असे सांगितले. त्यामुळेमुलांना उशिरापर्यंत शाळेत ताटकळत राहावे लागले.हुजूरपागा, हचिंग्स स्कूल, विबग्योअर स्कूल, सिंहगड, बिशप्स स्कूल आदी शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून आले. सकाळी स्कूल बसच्या तोडफोडीचे मेसेज व फोटो व्हायरलने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. काही शाळांनी मात्र सावध पवित्रा घेत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.>महाविद्यालयांचासंमिश्र प्रतिसादएनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची भेट घेऊन महाविद्यालये बंद करण्याची विनंती केली.त्याला महाविद्यालयांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांनी सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अथवा संलग्न महाविद्यालयांनी बंदमध्ये सहभाग घेतला नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.>बंदमध्ये युवक सहभागीबंदमध्ये युवकांनी सक्रिय सहभाग घेतला. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.पर्वती विधानसभा मतदारसंघात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. संबंधित दुकानदार व पेट्रोलपंप चालकांना विनंती केल्याने सिटीप्राईड थिएटर, परिसरातील दुकाने तसेच पेट्रोलपंप बंद ठेवले. संतोष नांगरे, अमोल ननावरे, संजय दामोदरे, करण गायकवाड आदी सहभागी होते.युवक कॉँग्रेसच्या वतीने डेक्कन येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. अमिर शेख, विकास लांडगे, सोनाली मारणे, भूषण रानभरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Schoolशाळा