पुणे - कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने पुण्यात 14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. हाच धोका लक्षात घेत पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बंद दरम्यानही वीज कापण्याची मोहीम सुरूच, महावितरणचे ९ कर्मचारी पॉझिटिव्ह
आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कुठल्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरता येणार नाही.
औरंगाबादमध्येही 5, 9 आणि 11वीच्या ट्यूशन बंद -पुण्या शिवाय महाराष्ट्रातील औरंगाबादमध्येही महापालिकेने 5 ते 9 आणि 11वीच्या ट्यूशन 15 मार्चपर्यंत बंद केल्या आहेत. मात्र, बोर्डाची परीक्षा असल्याने वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त आस्तिक कुमार यांनी विद्यार्थ्यांची गर्दी थांबविण्यासाठी हा आदेश दिला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासचा पर्याय देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे शुक्रवारी औरंगाबादेत तब्बल 247 कोरोना रुग्ण आढलून आले होते.
कोरोना रिटर्न्स; उपराजधानीत शुकशुकाट, बाजारपेठा बंदउपराजधानीत शुकशुकाट, बाजारपेठा बंद - कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे प्रशासनाने शनिवार व रविवार असे दोन दिवस बाजारपेठा व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी करत नागरिकांनीही सर्व व्यवहार बंद ठेवले. नागपूर शहरातील प्रमुख रस्ते, गर्दी ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठांमध्ये चिटपाखरूही दिसत नव्हते.
अमरावतीत पुन्हा लॉकडाऊन, 8 मार्चपर्यत मुदतवाढ -अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे क्षेत्रही आता कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात 1 मार्चच्या सकाळी 6 पासून 8 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोना लस घेण्यासाठी अशी करा नोंदणी; जाणून घ्या सारी प्रक्रिया...
अमरावती, अचलपूर व अंजनगाव सुर्जी या शहरात सकाळी 8 ते 3 या वेळेत जीवनावश्यक सेवा, दुकाने सुरू राहतील. बिगर जीवनावश्यक दुकाने बंद राहतील. नोंदणीकृत व यापूर्वी परवानगीप्राप्त उद्योग सुरू राहतील. तिन्ही शहरांतील आठवडी बाजारही बंद राहणार आहेत.
अशी आहे राज्याची स्थिती -महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास 21,46,777 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी तब्बल 52,092 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या 73,734 कोरोनाबाधित रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर 20,20,951 जणांनी कोरोनावर मात केली आहे.