लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : आंबेगाव तालुक्यात १ ते १० पटसंख्या असलेल्या २६ शाळा असून या शाळा आदिवासी क्षेत्रात येतात. पेसा कायद्यांतर्गत आदिवासी भागातील शाळा बंद करता येत नाहीत म्हणून या शाळांचे समायोजन करता येणे शक्य नाही. यामुळे पहिल्या टप्प्यात आंबेगाव तालुक्यातील शाळा समायोजनापासून दूर राहणार आहेत.कमी गुणवत्ता व कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन केले जावे, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे पाठविल्या आहेत. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या शिक्षण विभागात शाळा समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात २६ शाळा १ ते १० पटसंख्येच्या आहेत. मात्र, यातील बहुतांश शाळा अनुसूचित जमाती क्षेत्रात येत असल्याने या शाळा बंद करता येत नाही. त्यामुळेआंबेगाव तालुक्यातील एकही शाळा बंद होणार नाही.आंबेगाव व जुन्नर या दोन तालुक्यांमध्ये अनुसूचित जमाती क्षेत्र निश्चित केलेले आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी शासनाने पेसा कायदा राबविला आहे. दुर्गम आदिवासी भागातील गावांची लोकसंख्या अतिशय तोडकी असल्याने येथे शिक्षण घेणाºया मुलांची संख्यादेखील कमी असते. एक शाळा बंद झाली तर या गावातील मुले शिक्षणापासून वंचित राहतील, म्हणून पेसा कायद्यामध्ये शाळांना संरक्षण देण्यात आले आहे. यामुळे आदिवासी भागातील एकही शाळा बंद करता येत नाही.१० पेक्षा कमी पटसंख्या असणाºया शाळाआंबेगाव तालुक्यातील १० पेक्षा कमी पट असणाºया शाळा -कापसेवाडी ७, पसारवाडी ३, पांचाळे बुद्रुक ८, पांचाळे खुर्द ६,जांभळेवाडी ८, ढकेवाडी ४, पाटण ५, फणसवाडी ६, दिगद ७,मेघोली १०, घोटमाळ ४, घोडेवाडी ७, वरसावणे ८, काळवाडी ९,सावरली ६, पिंपळाचीवाडी ५, काळवाडी ८, पडाळवाडी ७, उपळवाडी १०, फदालेवाडी ८, काळेवाडी ७, आपटी ७, शिवखंडी ९, बाभळवाडी ८,गटेवाडी ८, रानमळा ९.
‘पेसा’मुळे शाळांना संरक्षण, आंबेगाव तालुक्यात कमी पटसंख्येच्या २६ शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:23 AM