शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

वेल्हेत अंगणवाडीताई चालवताहेत शाळा!

By admin | Published: October 06, 2014 6:41 AM

जोडून आलेल्या सुट्ट्या व निवडणुकीची कामे यांमुळे वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळा अंगणवाडीताई चालवत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले

मार्गासनी : जोडून आलेल्या सुट्ट्या व निवडणुकीची कामे यांमुळे वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळा अंगणवाडीताई चालवत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. येथील दहा शाळांत शनिवारी पाहणी केली असता, सहा शाळांत शिक्षक उपस्थित होते. मात्र चार शाळांतील प्रत्येकी एक शिक्षक रजेचा अर्ज ठेवून गायब होता. याची साधी वहीत नोंदही नसल्याचे दिसले. सोंडे कार्ला येथील शाळा अंगणवाडीताई चालवत होत्या.वेल्हे तालुक्यात शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चालला असून, शिक्षकावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या १५०च्या आसपास असून, एकूण ३५४ शिक्षक कार्यरत आहेत. ९५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीसाठी ८५ शिक्षक बीएलओचे काम करीत आहेत. वेल्हे तालुका दुर्गम डोंगराळ असून, येथील काही ठिकाणी विद्यार्थी दहा ते बारा किलोमीटरहून पायी चालत शाळेत येतात. मात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.‘लोकमत’ने वेल्हा-चेलाडी रस्त्यावरील दहा शाळांना भेटी दिल्या. सोंडे कार्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन शिक्षक असून, त्यापैकी एका शिक्षकाचा रजेचा अर्ज होता व एक शिक्षिका केंद्रशाळेत मीटिंगसाठी गेल्या होत्या. या ठिकाणी अंगणवाडीताई शाळा चालवत असल्याचे पाहावयास मिळाले. करंजावणे, कातवडी, आडवली या शाळांत प्रत्येकी एक एक शिक्षक रजेचा अर्ज ठेवून गायब झाल्याचे दिसले. कोणत्याही शाळेने याबाबत नोंदवहीत नोंद केली नव्हती.तालुक्यातील शालेय पोषण आहाराबाबत देखील उदासीनता दिसून येत आहे. मुलांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असून, या अन्नातून विषबाधा होण्याची दाट शक्यता आहे.तालुक्यात सध्या दिवाळीपूर्व परीक्षेचा कालावधी सुरू असून, ८५ शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी गेले आहेत तर उर्वरित शिक्षक रजेवर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. (वार्ताहर)