पुणे/कान्हूरमेसाई : जिल्ह्यातील ३ हजार ६८५ शाळा आजपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यासाठी सर्व शाळांना पुस्तके पाठविण्यात आली आहेत. काही ठिकाणी गुलाबपुष्प देऊन, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात येणार आहे. शाळेमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या मुलांचे ‘शालार्थ’ या सॉफ्टवेअरमध्ये नोंद करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.या वर्षीच्या शैक्षणिक सत्राला आजपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत या हेतूने सर्व शाळांना पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल्ह्यात नुकतीच शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पार पडली. यामुळे अनेक शिक्षक विस्थापित झाले होते. सध्या जिल्ह्यातील १४० शाळांवर शिक्षक नाहीत. या शाळा पहिल्याच दिवशी बंद राहू नयेत यासाठी शासनाते तयारी केली असून, या शाळांवर पर्यायी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यामुळे कुठलीच शाळा बंद राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.हसत खेळत शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आमदार, खासदार, जिल्ह्या परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उप सरपंच, सदस्य शाळा व्यवस्थापन कमिटी आणि पदाधिका-यांना आमत्रीत, करून त्यांच्या हस्ते गुलाब पुष्प, पाठ्य पुस्तके देऊन विद्यार्थ्याचे स्वागत केले जाणार आहे.‘शालार्थ’मध्ये होणार नव्या विद्यार्थ्यांची नोंदणीजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये यावर्षी नव्याने दाखल होणाºया विद्यार्थ्यांची नोंदणी ‘शालार्थ’ या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची संख्या कळण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दरवर्षी देण्यात येणाºया सर्व सूचनांचेही पालन करण्यात येणार आहे.
शाळांचा किलबिलाट आजपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 3:09 AM