शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

शाळांच्या मोकळ्या ‘खोल्या’ अंगणवाड्यांना देणार

By admin | Published: February 25, 2015 11:23 PM

जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्यांचा तत्काळ सर्व्हे करून तेथे जास्तीत जास्त अंगणवाड्यांची व्यवस्था करण्यास प्राधान्य दिले जाईल,

पुणे : जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या वर्गखोल्यांचा तत्काळ सर्व्हे करून तेथे जास्तीत जास्त अंगणवाड्यांची व्यवस्था करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्यातील ४,५७० अंगणवाड्यांपैकी २,२३९ ठिकाणी इमारती नाहीत. येथील शाळा या समाजमंदिर, खासगी शाळा, मंदिर, ग्रामपंचायत व इतर ठिकाणी भरत असल्याचे वृत्त लोकमतने २५ फेबु्रवारी रोजी प्रसिद्ध केले. याची जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली आहे. २०१० पासून आतापर्यंत अंगणवाड्यांसाठी ४,७६९.९३ लाख इतका निधी मिळाला आहे. त्यातील ४,३४९.९३ लाख इतका निधी खर्च झाला असून, ९२६ इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत. ३८७ इमारतींची कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजनेअंतर्गत आतापर्यंत निधी मिळाला आहे.२०१५-१६साठी १६ कोटी ५० लाखांची मागणी जिल्हा परिषदेतर्फे जिल्हा नियोजनकडे केली आहे. मात्र, या निधीत साधारण २५०च्या आसपास आणखी इमारती होऊ शकतात; मात्र हे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे पुढील नियोजनात यात लोकसहभाग, स्वयंसेवी संस्था यांची मदत घेऊन तसेच स्वत: जिल्हा परिषदही निधी टाकले, असे उमाप यांनी सांगितले. महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांनी सांगितले, की जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘आयडल रूम’ (मोकळी जागा) बहुतांश शाळांत उपलब्ध आहेत.यासाठी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याना शाळांमध्ये अशा मोकळ्या जागेचे सर्वेक्षण करण्याच्या तत्काळ सूचना देणार आहोत. सर्वेक्षणात जिल्हा परिषद शाळांत अशा किती जागा उपलब्ध आहेत? किती वापरण्याजोग्या आहेत? जिथे दुरुस्तीची गरज आहे तिथे तत्काळ दुरुस्ती करून इमारत नसलेल्या व इतर ठिकाणी भरणाऱ्या आंगणवाड्यांना तेथे लगेच हलवू. (प्रतिनिधी)