शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

सोशल मीडियावरील निधी संकलनातून लडाख मध्ये उभ राहातयं ' सायन्स पार्क '

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 7:00 AM

येत्या २० जून रोजी पुण्यात शिकायला आलेल्या लडाखच्या मुलींच्या हस्तेच पार्कचे उदघाटन होणार आहे.

ठळक मुद्देअसीम फौंडेशनचा पुढाकारभारतीय सैन्याच्या १४ कोअर चे प्रमुख या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी असणार असीम फाउंडेशनने २०१२ मध्ये प्रथम लडाख येथे कामाला केली सुरुवात

पुणे : सोशल मीडिया फक्त द्वेष पसरविण्याचे दुधारी अस्त्र आहे. त्याचा फक्त ट्रोलिंगसाठीच वापर केला जातो. हा समज पुणेकरांनी काहीप्रमाणात खोटा ठरवला आहे. सोशल मीडियावरील नेटिझन्सच्या मदतीतून एखादे स्वप्न साकार होऊ शकते याचे सकारात्मक उदाहरण समोर आले आहे. असीम फौंडेशनने सोशल मीडियाच्या माध्यमातून संकलित केलेल्या निधीद्वारे लडाख मध्ये मुलांसाठी ‘सायन्स पार्क’ उभारले आहे. गेली सतरा वर्षे भारताच्या सीमावर्ती भागात कार्य करणा-या असीम फाउंडेशनने हे विधायक पाऊल उचलले आहे. येत्या २० जून रोजी पुण्यात शिकायला आलेल्या लडाखच्या मुलींच्या हस्तेच पार्कचे उदघाटन होणार आहे. भारतीय सैन्याच्या १४ कोअर चे प्रमुख या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी असणार आहेत. लडाख भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि प्रतिकूल हवामानाचा भाग उर्वरित भारतापासून जवळपास सहा महिने तुटलेला असतो. येथील लोकसंख्येची घनताही कमी. क्षेत्रफळाने मोठा असूनही विकासाची कमतरता जाणवते. असीम फाउंडेशनने २०१२ मध्ये प्रथम लडाख येथे कामाला सुरुवात केली. शालेय विद्यार्थ्यांसाठी  व्यवसाय संधींची ओळख करून देणारा अभिलाषा प्रकल्प त्याठिकाणी राबविला आणि यातूनच लडाख च्या भागामधील शाळांशी संपर्क वाढला. या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संपर्क आणि मैत्री दौ-यांचे आयोजनही करण्यात आले. पुण्यात सध्या लडाखमधील ८ विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. परंतु  विद्यार्थ्यांना कोशात अडकवून न ठेवता त्यांच्या समोर शिक्षणातील प्राथमिक आणि  चिरकाळ टिकणा-या मूल्यांची रुजवणूक आणि संवर्धन केले पाहिजे या जाणिवेतून काम वाढत गेले. ‘‘विज्ञानाधारित दृष्टिकोन, तार्किक मीमांसा आणि जिज्ञासा या तीन मूल्यांना एका सूत्रात बांधण्यासाठी म्हणून लडाख येथे ‘सायन्स पार्क’ची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. लडाखची ओळख  सहलीची उत्तम जागा आणि निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण एवढीच मर्यादित न राहता या भागाला एक नवी ओळख मिळावी यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला,’’ अशी माहिती असीम फौंडेशनशचे संस्थापक-अध्यक्ष सारंग गोसावी यांनी ‘लोकमत’ला दिली.  ---------------------------------------------------------असे झाले स्वप्न पूर्ण...या पार्क उभारणीसाठी  दोनशे रूपये द्यावेत असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.  त्यातून दीड ते दोन लाख निधी संकलित झाला. फौंडेशनचे सगळे स्वयंसेवक नोकरी करतात. त्यांनी आपल्या पगारातून काही निधी दिला. इथे लडाखमधून शिकायला आलेल्या मुलीच्या पालकांनी अर्धा एकर जागा दिली. या पार्कच्या उभारणीसाठी स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. आमचे पार्कचे स्वप्न पूर्ण होत आहे याचा आनंद  असल्याचे सारंग गोसावी यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेladakhलडाखscienceविज्ञान