पुणे : यंदा बारावीच्या निकालात विज्ञान शाखेची टक्केवारी सर्वाधिक ९६.०९ टक्के आली आहे. तर सर्वात कमी निकाल कला शाखेचा लागला आहे. त्यामुळे कला शाखेपेक्षा विज्ञानाचा अभ्यास करणारे विद्यार्थी हुशार बनले आहेत.
विज्ञान शाखेला ६ लाख ४९ हजार ७५४ विद्यार्थी बसले होते. त्यातील ६ लाख २४ हजार ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९६.०९ आहे. कला शाखेला ३ लाख ८७ हजार २८५ विद्यार्थी बसले. त्यापैकी २ लाख २५ हजार ५४५ जण पास झाले. त्यांची टक्केवारी ८४.०५ आहे. वाणिज्य शाखेला ३ लाख ३५ हजार ८०४ विद्यार्थी बसले आणि त्यापैकी ३ लाख ३ हजार ६५६ जण उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९०.४२ आहे. व्यवसाय अभ्यासक्रमाला ४० हजार २७४ विद्यार्थी बसले आणि त्यातील ३५ हजार ९४८ पास झाले. त्यांची टक्केवारी ८९.२५ टक्के आहे. आयटीआयसाठी ३ हजार २५४ जण बसले आणि त्यापैकी २ हजार ९५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी ९०.८४ टक्के लागली.