या गोदामात पुष्ठा, प्लास्टिक पोती,जुन्या टायरच्या,प्लास्टिक ड्रमच्या आदी सामान होते. गोदामाला आग लागल्याने दोन किलोमीटर वरून आकाशात प्रचंड मोठे धुराचे लोट दिसत होते. येथे रहिवासी वस्ती असल्याने अग्निशमन दलाच्या वाहनांनी प्रसंगावधान राखत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल. या भागात जवळपास १० ते १२ भंगाराची गोदामे आहेत. येथील एका गोदामाला सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला आग लागली येथे साठवून ठेवलेले पुष्ठा व प्लास्टिकमुळे आगीने रौद्र रूप धारण केले येथील गोदामे ही एकमेकाला लागुन असक्याने बाजूच्या गोदमाना देखील आग लागल्याने आगीच्या ठिकाणाहून धुराचे लोट दिसत असल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. या गोदामात भंगार कापण्यासाठी व प्लास्टिक वितळवण्यासाठी गॅसच्या टाक्याचा साठा असतो येथे कामगार राहत असल्याने येथे असणाºया गॅसच्या टाक्या बाहेर काढण्यात आल्या अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती,येथे उन्हाळ्यात दर वर्षी आग लागते मात्र आजची आग मोठ्या प्रमाणावर होती. आग लागण्याचे कारण समजु शकले नाही मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यावर बारामती नगर परिषदेच्या २ ,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ १, दि.माळेगाव सहकारी साखर कारखान्याची १ , तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची १ अशा अग्निशमन दलाच्या गाड्यांनी प्रयत्न करुन दुपारपर्यंत आग आटोक्यात आली.
बारामती शहरातील फलटण रस्त्यावरील भंगार गोदामाला लागलेल्या आगीमुळे आकाशात दिसणारे धुराचे लोट
१८०४२०२१-बारामती-०४
---------------------------