कोल्हापूर : यंदाच्या फुटबॉल हंगामातही परदेशी खेळाडूंना स्थानिक स्पर्धांमध्ये खेळण्यास बंदी कायम केली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील १६ संघांपैकी काही संघांनी अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी राज्यातील नामवंत संघातील खेळाडूंना करारबद्ध केले आहे. यामध्ये पाटाकडील (अ), दिलबहार (अ), प्रॅक्टिस क्लब, गोल्डस्टार, खंडोबा (अ), पॅट्रियट, साईनाथ, आदी संघांचा समावेश आहे. यंदाचा हंगाम महापालिका निवडणुकांमुळे लांबल्याने यंदा फुटबॉल स्पर्धा होणार की नाही, असा सवाल फुटबॉलप्रेमींमध्ये होता. यात ‘केएसए’नेही १९ ते २६ नोव्हेंबरअखेर खेळाडू आणि संघांची नोंदणी करीत यंदाही फुटबॉल हंगाम होण्याचे संकेत दिले. त्यामुळे फुटबॉल संघांनी परदेशी खेळाडू नाही, तर राज्यासह कर्नाटकातील नामवंत फुटबॉलपटूंना यंदाच्या हंगामासाठी करारबद्ध केले आहे. पाटाकडील तालीम मंडळ (अ)कडून गौरव पेडणेकर, उमेश बांदोडकर (गोवा), किरण कावणेकर (गडहिंग्लज), वृषभ ढेरे (पुणे), अक्षय बागवे (सांगली). फुलेवाडी क्रीडा मंडळाकडून प्रथमेश रावण (शिवनेरी), निखिल जाधव (खंडोबा), विक्रम शिंदे (खंडोबा), प्रणॉय गोन्दिन्हो (गोवा), तर दिलबहारकडून फुलेवाडी क्रीडा मंडळाकडे करण चव्हाण-बंदरे, माणिक पाटील हे खेळताना दिसणार आहेत. प्रॅक्टिस क्लबकडे अमृत हांडे (शिवाजी), सतीश आहेर (शिवाजीयन्स, पुणे), शकील पटेल (खंडोबा), सचिन बारामती (खंडोबा), वैभव राऊत (शिवाजी), इंद्रजित मोंडाल (कोलकाता) हे खेळताना दिसणार आहेत. बालगोपाल तालीम मडंळाकडून अजित पोवार (फुलेवाडी), सूरज जाधव, अर्जुन साळोखे (शिवनेरी), आरिफ चित्तेवान( बाहेरील), आकाश भोसले (शिवाजी), अभिषेक कदम (सातारा). दिलबहार तालीम मंडळ (अ) कडे साहिल निंबाळकर, आशिष गवळी (फुलेवाडी), फैजल पटेल (गोवा), राजू मिरगाला (सांगली), अक्षय चव्हाण (बेळगाव), सुशील सावंत (प्रॅक्टिस), अभिजित शिंदे (पुणे), संग्रामसिंह थोटवडे (पुणे). दिलबहार (ब)मध्ये सुयोग सावंत (प्र्रॅक्टिस), मैनुद्दीन सय्यद (खंडोबा-औरंगाबाद ). खंडोबाकडे अजिज मोमीन, तर खंडोबा (ब)कडे अमन मोरे (सांगली). कोल्हापूर पोलीस संघात ओमकार इंगवले आणि शिवम साळोखे (सातारा). पॅट्रियट संघाकडे मोहसीन बागवान, अजमत खान (औरंगाबाद) व स्थानिक खेळाडू मोहीत मंडलिक (फुलेवाडी) हे खेळताना दिसणार आहेत. यासह साईनाथ स्पोर्टसकडे योगेश हिरेमठ व जोना जेडी. दिलबहार ‘ब’कडून येशू प्रकाश ख्रिस्तोफर (कर्नाटक). संध्यामठ तरुण मंडळाकडून यंदा रोहित साठे (फुलेवाडी). शिवाजी तरुण मंडळाकडे खंडोबा तालीम मंडळाकडून श्रीधर परब, विकी सुतार हे खेळताना दिसणार आहेत. याशिवाय श्रेयस मोरे, मॅथ्यू कु्रटीन्हो (बालगोपाल) यांचाही समावेश आहे. एकूण ४७ खेळाडूंनी संघ बदल केला असल्याने सर्वच सामने रंगतदार होतील. त्यामुळे फुटबॉल हंगामबद्दल शौकिनांत प्रचंड कुतूहल आहे.थेट विमानाचा प्रवास आणि लाखोंची उलाढालप्रॅक्टिस क्लबकडून यंदा कोलकाता येथील प्रसिद्ध फुटबॉलपटू इंद्रजित मोंडलने नोंदणी केली. त्याला नोंदणीसाठी ‘कारभाऱ्यांनी ’ कोलकाता येथून थेट पुण्यापर्यंत विमानाने आणले. दिलबहार, शिवाजी, पाटाकडील, प्रॅक्टिस या फुटबॉल संघांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. याचबरोबर काही खेळाडूंना चांगले मानधनही दिले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात खेळाडूंवर सध्या तरी किमान २५ लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे फुटबॉलमधील जाणकारांकडून बोलले जात आहे.
नव्या खेळाडूंनी गाजणार हंगाम
By admin | Published: November 27, 2015 11:10 PM