आळेफाटा : आळेफाटा पिंपरीपेंढार व परिसरात रविवारी रात्री व सोमवारी पहाटेच्या सुमारास भूगर्भातील अंतर्गत घडामोडींमुळे आवाज व धक्के सौम्य स्वरूपात जाणवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आळेफाट्यापासून दहा किलोमीटरवरील शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील बोटा व परिसरात रविवारी रात्री पावणेनऊला २.३, तर सोमवारी पहाटेच्या सुमारास २.८ रिश्टर स्केल तीव्रतेचे सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिक येथील भूकंपमापन यंत्रात या धक्क्यांच्या नोंदी झाल्या आहेत. अगदी याच सुमारास आळेफाटा, आळे परिसरातील संतवाडी, आळेखिंडी, मोरदरा, पादिरवाडी, वडगाव आनंद व पिंपरीपेंढार येथेही सौम्य धक्के जाणवल्याचे जयराम गागरे, जयेश जंगम, सुनील कुटे, राजेश कुटे यांनी सांगितले.
आळेफाटा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
By admin | Published: January 10, 2017 2:46 AM