लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दक्षिणेत सुुरु असलेल्या अस्थिर वातावरणामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली होती. हा अडथळा आता दूर झाल्याने उत्तेरकडील थंड वार्यांचा जोर वाढू लागला आहे. त्याचा परिणाम राज्यासह पुण्यात जाणविण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी या हंगामातील सर्वात निचांकी किमान तापमानाची नोंद झाली. शहरात शिवाजीनगर येथे ९.२, पाषाण येथे १० आणि लोहगाव येथे ११०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
त्याचबरोबर राजगुरुनगर ९.१, तळेगाव येथे १०.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
यापूर्वी या हंगामात पुण्यात १२ नोव्हेंबर रोजी पुणे ९.८, पाषाण ११ आणि लोहगाव येथे १२.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तापमानात मोठी वाढ होऊन काही ठिकाणी पाऊसही झाला होता.
सूर्याची उष्णता कमी होत आहे. तसेच आकाश निरभ्र आहे. आर्द्रता अधिक असल्याने हवामान कोरडे आहे. तसेच उत्तरेकडील वार्याचा जोर वाढल्याने शहरातील तापमान घट झाली आहे. ही स्थिती आणखी काही दिवस राहणार असून शहरातील किमान तापमान ९ ते १० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
.........
पुण्यातील डिसेंबर महिन्यातील सर्वात कमी किमान तापमान
१९ डिसेंबर २०१९ १३.७
२९ डिसेंबर २०१८ ५.९
२९ डिसेंबर २०१७ ८.७
११ डिसेंबर २०१६ ८.३
२६ डिसेंबर २०१५ ६.६
२९ डिसेंबर २०१४ ७.८
१४ डिसेंबर २०१३ ६.८
२७ डिसेंबर २०१२ ७.४
२७ डिसेंबर २०११ ७.६
२० डिसेंबर २०१० ६.५
२५ डिसेंबर २००९ ८.५
...........
२७ डिसेंबर १९६८ ३.३ (सर्वात कमी किमान तापमान)