पुणो : लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणारांना विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांची जागा दाखविली, अशा शब्दांत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी पक्षाअंतर्गत बंडखोरी करणारांचा आज समाचार घेतला.
शिवाय विद्यमान शहर कार्यकारिणीवर नाराजी व्यक्त करीत नव्या शहराध्यक्षपदासाठी पूर्णवेळ देणा:या व कार्यक्षम व्यक्तीच्या निवडीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शहरातील विधानसभेच्या आठही जागांवर काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला. त्याविषयी कदम म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव प्रस्थापितांच्या विरोधी आणि मोदी लाटेमुळे झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, मला तसे वाटत नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी काँग्रेसचे काम केले नाही, त्यांना मतदारांनी जागा दाखविली. राज्यभरातील पराभव हा चुकीच्या नियोजनामुळे झाला आहे. अन्यथा काँग्रेसच्या 25 ते 35 जागा केवळ 1 ते 1क् हजार मताच्या फरकाने पराभूत झाल्या नसत्या. एलबीटीचा निर्णय व नेत्यांच्या फाजील आत्मविश्वासाचा फटका काँग्रेसला बसला आहे.
पूर्णवेळ
शहराध्यक्ष हवा..
4सध्याच्या शहर कार्यकारिणीविषयी नाराजी व्यक्त करताना कदम म्हणाले, की शहरात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी पूर्णवेळ देणारा, कार्यक्षम व आक्रमक शहराध्यक्षाची गरज आहे. त्यासाठी माङो प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा व राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध..
4भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याची थेट टीका विश्वजित कदम यांनी केली. राष्ट्रवादीने भ्रष्टाचार लपविण्यासाठी भाजपाला छुपा पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीची एवढी लाचारी आपण कधीही पाहिलेली नसल्याची टीकाही कदम यांनी केली.