पुणे : फरांदे क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित १६ वर्षांखालील आंतरअकादमी स्पर्धेत पूना क्लब आणि क्रिकेट मास्टर क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला.विधी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ऋषीकेश गेंड याने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर क्रिकेट मास्टर क्लबने ओम क्रिकेट अकादमीचा २३ धावांनी पराभव केला. सामन्यामध्ये क्रिकेट मास्टर क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना २५ षटकांत ७ गडी बाद १६७ धावा केल्या. प्रथमेश कारंडे (२०), सानिध्य वेलणकर (५६), ऋषीकेश गेंड (४०) व आदित्य मोरे (१९) यांनी संघाला चांगली धावसंख्या उभी करून दिली.या आव्हानाला उत्तर देताना ओम क्रिकेट अॅकॅडमीचा डाव २४.३ षटकांत व १४४ धावांवर संपुष्टात आला. रितेश देशमुख (२८), मनोज निगडे (२६), प्रेम भालेराव (३१), अविनाश क्षत्रीय (१५) यांची खेळी संघाचा पराभव वाचवू शकली नाही. आरशिन कुलकर्णी याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पूना क्लब संघाने फरांदे क्रिकेट क्लबचा १० गडी राखून दणदणीत पराभव केला. फरांदे सीए संघाने पहिल्यांदा फलंदाजी घेतली; पण त्यांचा डाव स्थिरावलाच नाही. पूना क्लबच्या गोलंदाजीसमोर फरांदे संघाला १७.२ षटकांत ७२ धावाच करता आल्या. पूना क्लबकडून दीपक शर्मा याने ६ धावांत ३, तर आरशीन कुलकर्णी याने १० धावांत ४ व राज नवले याने ४ धावांत २ गडी टिपून झटपट संघ गुंडाळला. पूना क्लबने ही धावसंख्या ५.५ षटकांत व एकही गडी न गमावता पूर्ण केली. प्रथमेश भोपळे (नाबाद ३७) व कपिल देडगे (नाबाद १९) यांनी संघाला नाबाद विजय मिळवून दिला.संक्षिप्त धावफलक : गटसाखळी फेरी :क्रिकेट मास्टर क्लब : २५ षटकांत ७ बाद १६७ (प्रथमेश कारंडे २०, सानिध्य वेलणकर ५६, ऋषीकेश गेंड ४०, आदित्य मोरे १९, शुभम सोन्ने २-२३) वि.वि. ओम क्रिकेट अकादमी : २४.३ षटकांत १० गडी बाद १४४ धावा (रितेश देशमुख २८, प्रेम भालेराव ३१, वरद जोशी ४-२२, आदित्य मोर२-४१).फरांदे क्रिकेट क्लब : १७.२ षटकांत सर्व बाद ७२ (दीपक शर्मा ३-६, आरशीन कुलकर्णी ४-१०) पराभूत वि. पूना क्लब: ५.५ षटकात बिनबाद ७५ (प्रथमेश भोपळे नाबाद ३७).
पूना क्लब संघाचा सलग दुसरा विजय
By admin | Published: April 26, 2017 4:07 AM