पुणे :
शहरात ६० वर्षांपुढील २ लाख ४२ हजार २८५ जणांना, तर ४५ ते ५९ वयोगटातील १ लाख ८३ हजार ७ जणांना अद्याप दुसरा डोस देण्याचे बाकी आहे़ फ्रंटलाईन वर्कर या गटातील ४५ हजार ६७४ जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहे. परंतु, १ मेपासून शहरातील १८ ते ४४ वयोगटातील मर्यादित लसीकरण वगळता इतर वयोगटातील सर्वांचे लसीकरण बंद आहे़
परिणामी राज्य शासनाकडून लस प्राप्त होताच, प्रारंभी ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य राहणार आहे़ त्यातही लस देताना पहिला डोस घेतल्यानंतर ज्या व्यक्तींना जास्त दिवस झाले आहेत, अशा व्यक्तींना प्रथम लस दिली जाणार आहे़
-----------------------
सर्व लसीकरण केंद्रांना समान लसपुरवठा
शहरातील सर्व लसीकरण केंद्रांना समान लसपुरवठा करण्याबाबतचे नियोजन महापालिकेने केले आहे़ याकरिता प्रत्येक लसीकरण केंद्रावर गेल्या पाच दिवसांत किती लसीकरण झाले, याची सरासरी काढून त्यांना पुढील दिवसासाठी लस पुरविली जाणार असल्याचे रुबल अग्रवाल यांनी सांगितले आहे़
------------------------------------
लसीच्या दुसऱ्या डोसला विलंब झाला तरी काळजी नको
लसीच्या तुटवड्यामुळे शहरातील सर्वच लसीकरण केंद्र बंद असल्याने, अनेकांना को-व्हॅक्सिजन व कोव्हिशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी दिलेली तारीख उलटून गेली आहे़ मात्र लसीच्या दुसऱ्या डोसला विलंब झाला तरी काळजी करण्याचे कारण नाही़ लसीचा पहिला डोस हा देखील शरिरात कोविड-१९ विषाणूच्या विरोधात लढणाऱ्या अॅण्टिबॉडीज तयार करत आहे़ त्यामुळे दुसरा डोस घेताना थोडासा विलंब झाला तरी काही फरक पडणार नाही, असे महापालिकेचे साथरोग नियंत्रण अधिकारी तथा सहायक आरोग्य अधिकारी डॉ़ संजीव वावरे यांनी सांगितले आहे़