पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून बाणेर सर्व्हे नं. ३३ येथे दुसऱ्या कोविड हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतीची पाहणी
महापौर मुरलीधर मोहळ, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, सभागृह नेते गणेश बिडकर, शहर अभियंता वाघमारे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक बाबूराव चांदेरे, आशिष मालपाणी यांनी केली.
एक महिन्याच्या आत या हॅास्पिटलचे काम पूर्ण होणार आहे. तसेच, यामध्ये सुमारे १५० ऑक्सिजन बेड व ५० आय.सी.यू. बेड अशा सुमारे २०० बेडची सुविधा याठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
सदर कोविड हॉस्पिटलचे काम महापौर निधीतून व सी.एस.आर. फंडातून होत आहे. सद्य:परिस्थिती पाहता बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पंचवटी, सुस, म्हाळुंगे या भागातील नागरिकांना तसेच शहराच्या इतर भागातील नागरिकांना ही एक दिलासादायक बाब आहे.