मागील महिन्यापासून शेतातील पिके जळून चालली होती. सध्यातरी इंदापूर तालुक्यातील शेटफळपासून वितरिका १४५ ते २०२ या इंदापूरच्या वितरिकांवर ऊसपिकाच्या क्षेत्राचे प्रमाण तालुक्यात जास्त आहे. उन्हाळी आवर्तनाच्या पाण्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. कालव्याच्या पाण्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि आजूबाजूच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करतील. त्यामुळे दुष्काळाच्या झळा थोड्याफार प्रमाणात कमी होतील. शेतात असणाऱ्या पिकांच्या फायद्यासाठी हे पाणी गरजेचे असल्याने लोकांनी कधी पाणी येणार या निर्णयाकडे वाट बघत होते. अखेर शेतीसाठी इंदापूरपासून शेटफळपर्यंत पाणी देण्यात येणार आहे. मात्र तुटून गेलेल्या उसामुळे शेती क्षेत्राला मागणी कमी प्रमाणात होऊ शकते. तरी रोटेशन पूर्ण होईपर्यंत पंधरा दिवस पाणी देण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता विराज परदेशी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
खडकवासला धरणातून सोडलेले पाणी इंदापूर तालुक्यात अकोले येथे पोहोचले.