मेदनकरवाडी ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी सरपंच रामदास मेदनकर हे आपली पत्नी सुरेखा व मुलगा संकेत या एकाच कुटुंबातील तिघांचा विजय झाला आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात याच कुटुंबातील चौघे जण ग्रामपंचायतमध्ये होते, प्रियंका रामदास मेदनकर यांनी सरपंच भूषवले होते. कोरोनाच्या काळात उत्कृष्ट काम केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रियंका यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला होता. प्रियांका यांचे लग्न झाल्याने त्यांनी निवडणूक लढवली नाही.मात्र कुटुंबातील तिघांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतमध्ये प्रवेश मिळवला आहे.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - प्रभाग क्रमांक १ :- महेंद्र मेदनकर (६२२ मते)
संजय वाघमारे (४१२ मते) प्रभाग क्रमांक २ :- अमोल साळवे (३५० मते)
जयश्री दत्तात्रय भुजबळ (३०२ मते)
सिंधू शांताराम मेदनकर (२०३ मते) प्रभाग क्रमांक ३ :- संभाजी मेदनकर (१५७ मते)
सुमन खरात (१२५ मते) प्रभाग क्रमांक ४ :- संकेत रामदास मेदनकर (३३५ मते)
सुरेखा रामदास मेदनकर (२८१ मते)
रामदास मुरलीधर मेदनकर (३८२ मते)
प्रभाग क्रमांक ५ :- कु. सलोनी रवींद्र मेदनकर - ( ६३७ मते )
मंगल शाम मेदनकर - (५७३ मते)
विजय मेदनकर - (५६८ मते )
प्रभाग क्रमांक :- पल्लवी हेमंत भुजबळ (३५१ मते )
नीलम अमित मेदनकर (५०९ मते )
गणेश ज्ञानेश्वर वाघमारे ( ५५५ मते )
--------------------------------------------------------
* फोटो - मेदनकरवाडी ग्रामपंचायतमध्ये एकाच कुटुंबातील विजयी उमेदवार.