धनकवडी : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस आवश्यक असून त्यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रांवर होणारी संभाव्य गर्दी आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता नगरसेविका राणी भोसले यांच्या प्रयत्नातून कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक ३८ बिबवेवाडी येथील कै. चिंतामणराव देशमुख उर्दू माध्यमिक शाळेमध्ये दुसरे लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले.
खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्याहस्ते या लसीकरण केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आरोग्य अधिकारी आशिष भारती, आयुक्त विक्रम कुमार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, शहर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते विकास लवटे, अमोल चौधरी, जितेंद्र कोंढरे, सचिन थोपटे, संभाजी भोसले, रायबा भोसले, विजय दरडिगे, क्षेत्रिय अधिकारी डॉ. ज्योती धोत्रे, डॉक्टर मदन बिरादार, सहायक डॉक्टर अमोल पाटील उपस्थित होते.
फोटो - धनकवडी लस