मुळशीतील १३ गावे कोरोनाग्रस्त असून ५१ पेक्षा अधिक जण उपचार घेत आहेत. डिसेंबरपूर्वी मुळशीतील ७१ गावे कोरानाग्रस्त झाली होती. जानेवारीनंतरच्या दुस-या लाटेत १३ गावांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आयटीनगरीतील मारूंजी, माण, हिंजवडीत कोरोना वेगाने पसरत असून २० पेक्षा अधिक रूग्ण आढळल्यास गावे लॉकडाऊन करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
मास्क न वापरल्यास कारवाईचे आदेश सर्व गावांना देण्यात आले आहेत.यानुसार मारूंजी,माण, हिंजवडी, बावधनसह अनेक गावात शनिवारी ग्रामपंचायतीने थेट कारवाई केली आहे.मास्क न घातल्यास ५०० रूपयांचा दंड हा शनिवारी १०० पेक्षा अधिक ग्रामस्थ व दुकानांदारांकडून घेण्यात आला.
याबाबत गट विकास अधिकारी संदीप जठार यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सतर्क रहाण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना अधिक पसरू नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहनही जठार यांनी केले आहे.
फोटो ओळ : मुळशी तालुक्यामध्ये मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून पाचशे रुपयाचा दंड वसूल करतेप्रसंगी.