शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट मे अखेरीस ओसरणार; महाराष्ट्रापासूनच होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 6:07 AM

महाराष्ट्रापासूनच होणार सुरुवात

प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे : कोरोनाची दुसरी लाट मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून ओसरण्यास सुरुवात होणार असल्याचा दिलासादायक अंदाज आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या वैज्ञानिकांनी ‘सूत्र’ नावाच्या एका प्रारूपाचा वापर करून वर्तविला आहे. याची सुरुवात महाराष्ट्रापासूनच होणार असून, रुग्णसंख्या कमी होणार आहे.

कोरोनाच्या  दुसऱ्या लाटेचा उच्चांक सर्वप्रथम महाराष्ट्राने अनुभवला. त्यामुळे १५ मेनंतर लाट ओसरण्याची सुरुवातही महाराष्ट्रापासूनच होईल, असा अंदाज या गणीतीय प्रारूपाच्या माध्यमातून बांधण्यात आला आहे. यानुसार  भारतात १४ ते १८ मे दरम्यान  कोरोना रुग्णांची संख्या सर्वोच्च  बिंदू गाठेल आणि तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागेल. वेगवान लसीकरण, नागरिक घेत असलेली काळजी आणि आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा यातूनच दुसऱ्या लाटेवर मात करता येईल, असा विश्वास वैद्यक तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. 

तिसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील लाट ओसरायला सुरुवात होईल. दुसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढली. त्यानंतर इतर राज्यांमध्ये संसर्गाचा वेग वाढला.      - डॉ. सुभाष साळुंखे, सदस्य,     कोरोना कृती समिती, महाराष्ट्र

कोरोना साथीच्या वाढीची अचूक संख्यात्मक मांडणी अद्याप कोणीही करू शकलेले नाही. कोरोनाचा प्रसार डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या काळात कमी का झाला होता, अचानक का वाढला, याबाबत डेटा उपलब्ध नाही. जे आपल्या हातात नाही, त्याबाबत अंदाज बांधण्यापेक्षा जे आपल्या हातात आहे, त्यावर भर द्यायला हवा.     - डॉ. मिलिंद वाटवे,     प्रसिद्ध जैवशास्त्रज्ञ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे