शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत सर्वच वयोगटातील रुग्णसंख्या दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:08 AM

डमी - ७७८ पुणे : शहराने कोरोनाची पहिली लाट गेल्यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत आणि दुसरी लाट यावर्षी मार्च-एप्रिल ...

डमी - ७७८

पुणे : शहराने कोरोनाची पहिली लाट गेल्यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांत आणि दुसरी लाट यावर्षी मार्च-एप्रिल महिन्यात सर्वाधिक अनुभवली. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला. दुसऱ्या लाटेने तरुणांमध्ये संसर्ग जास्त प्रमाणात पसरला असला तरी, सर्वच वयोगटांना पहिल्या लाटेच्या तुलनेत प्रचंड फटका बसला. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिसरी लाट रोखण्याच्या दृष्टीने वेगवान लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या तुलनात्मक आकडेवारीतून यावर्षी रुग्णसंख्येने गाठलेला उच्चांक लक्षात येतो. सर्वच वयोगटातील रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत दुप्पट झाली. पहिल्या लाटेत ज्येष्ठांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला, मात्र तरुणांची संख्या दोन्ही लाटांमध्ये धडकी भरवणारी होती. विषाणूमध्ये झालेले डबल म्युटेशन, संसर्गाचा वाढलेला वेग आणि झपाट्याने होणारा प्रसार यामुळे दुसरी लाट जास्त नुकसान करणारी ठरली.

पहिली लाट ओसरल्यावर कोरोना गेला, असा सर्वांचाच समज झाला. त्यामुळे आंतरनियम, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर जवळपास बंद झाला होता. आरोग्य यंत्रणाही गाफील राहिली. त्याचवेळी अचानक दुसरी लाट येऊन धडकल्याने सर्वच स्तरांवर ताण निर्माण झाला. पहिल्या लाटेत आपल्याकडे साथीवर मात कशी करायची, याचे उत्तर आपल्याकडे नव्हते. मात्र, आता लसीकरणाच्या रूपाने उत्तर मिळाले आहे. त्यामुळे सर्वच वयोगटांचे वेगाने लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्सही स्थापन करण्यात आला आहे. मुलांकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

-------

कोरोना पॉझिटिव्ह (पहिली लाट)

वयोगट ऑगस्ट सप्टेंबर एकूण

० ते १० २३०८ २४१६ ४७२४

११ ते २० ३३४५ ३६५७ ९१५४

२१ ते ३० ७६०८ ९१५४ १६७६२

३१ ते ४५ १२९४१ १५८८६ २८८२७

४६ ते ६० ९०४५ ११४११ २०४८६

६१ ते ७५ ४७५९ ५९७६ १०७३५

७६ ते ९० १०६१ १३५१ २४१२

९१पेक्षा जास्त ५१ ६७ ११८

-----

कोरोना पॉझिटिव्ह (दुसरी लाट)

वयोगट मार्च एप्रिल एकूण

० ते १० २३८१ ६३४२ ८७२३

११ते २० ४५२६ ११२७६ १५८०२

२१ ते ३० १२९५५ ३१२१० ४४१६५

३१ ते ४५ २१५४३ ५१४११ ७२९५४

४६ ते ६० १४३७९ २९०५८ ४३४३७

६१ ते ७५ ८५९८ १६५३९ २५१३७

७६ ते ९० २१६२ ४१४४ ६३०६

९१पेक्षा जास्त ९६ १९६ २९३

----

तिसऱ्या लाटेची तयारी

संभाव्य तिसऱ्या लाटेकरिता महानगरपालिकेचे एकूण ७ डीसीएच, ४ डीसीएचसी तयार आहेत. यात एकूण २२८७ बेड्स असून, १७०७ ऑक्सिजनसह, २७ ऑक्सिजनविरहित बेड्स आहेत. तसेच २४५ आयसीयू व्हेंटिलेटरसह व १९८ आयसीयू व्हेंटिलेटररहित बेड्स उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयांकडे एकूण ४३ डीसीएच व १५१ डीसीएचसी कार्यरत आहेत. यात ८३०७ एकूण बेड्स असून ५३५९ ऑक्सिजनसह व १९०७ ऑक्सिजनविरहित बेड्स आहेत. ५८५ आयसीयू व्हेंटिलेटरसह व ४५६ आयसीयू व्हेंटिलेटररहित बेड्स उपलब्ध आहेत. आवश्यकता भासल्यास बेडसंख्या वाढवण्यासाठी खासगी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. सीईओपी जम्बो कोविड सेंटर येथे बालकांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राजीव गांधी रुग्णालय येथे पेडियाट्रिक डीसीएचमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे.