शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

दुसऱ्या लाटेला जोरदार ओहोटी, खाटा उपलब्ध, ऑक्सिजनही मुबलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:12 AM

नीलेश राऊत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाची दुसऱ्या लाटेने एप्रिल महिन्यात उच्चांक गाठला. पण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ...

नीलेश राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाची दुसऱ्या लाटेने एप्रिल महिन्यात उच्चांक गाठला. पण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या लाटेला लागलेली ओहोटी कायम असल्याचे दिलासादायक चित्र आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ‘अमुकच रुग्णालय हवे,’ असा आग्रह नसेल तर कोरोनाबाधितांना रुग्णालयातील खाट (बेड) ही विनासायास मिळू लागली आहे. ऑक्सिजनचाही मुबलक पुरवठा असून सध्या २ हजार ८८४ ऑक्सिजन खाटा रिक्त आहेत.

एप्रिल महिन्यात रुग्णालयात खाट आणि त्यातही ऑक्सिजन खाटेसाठी वणवण करावी लागत होती. महापालिकेकडून २० मे रोजीच्या सायंकाळी सहापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार १३३ आयसीयू खाटा आणि २१ व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. जम्बो हॉस्पिटलमध्येही सध्या ४०३ रुग्ण असून येथील उर्वरित सर्व ऑक्सिजन खाटा रिक्त आहेत.

कोरोनाबाधितांची दुसरी लाट प्रामुख्याने उपनगरांमध्ये, सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्त्यांमध्ये आढळून आली. गेल्यावर्षी पहिल्या लाटेचा प्रकोप अनुभवलेल्या दाट लोकवस्तीच्या मध्यवर्ती पेठांमध्ये तसेच झोपडपट्टी भागात दुसऱ्या लाटेचा जोर कमी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोहियानगर-कासेवाडी हा भाग आहे. या परिसरात १ मे रोजी केवळ ९ कोरोनाबाधित आढळून आले. पुढे दिवसाकाठी ही संख्या कमी होत गेली. आता तर ती फक्त एकवर आली आहे.

रुग्णवाढीचा वेग अधिक असलेल्या औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एप्रिल महिन्यात १० हजार ८४४ कोरोना रुग्ण होते. पण मे महिन्याच्या वीस दिवसांत येथे केवळ ३ हजार २१४ रुग्ण आढळून आले आहेत. हीच परिस्थिती धनकवडी, सहकारनगर, हडपसर, मुंढवा येथे असून एप्रिल महिन्याच्या तुलनेत ७० टक्क्यांनी रुग्ण संख्या या भागातही कमी झाली आहे.

दरम्यान हडपसर, मुंढवा येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतले सर्वाधिक रुग्णवाढ दिसून आली. एप्रिल महिन्यात या एकाच क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २१ हजार ८८० रुग्ण आढळून आले होते. मात्र मे महिन्यातल्या पहिल्या पंधरवड्यात या भागातली रुग्णसंख्याही झपाट्याने कमी झाली असून १ ते १६ मे दरम्यान फक्त ५ हजार ७७७ रुग्ण आढळून आले.

चौकट

शहरातील क्षेत्रीय कार्यालयनिहाय घटलेली रुग्णसंख्या

कार्यालयफेब्रवारी मार्च एप्रिल१ मे ते १६ मेपर्यंत

औंध-बाणेर ५६७ ५१७८ २९४३ २९४३

भवानी पेठ २४१ २१३२ ३०८५ ५१४

बिबवेवाडी ६४३ ४४३६ ७३९८ १४९५

धनकवडी/सहकारनगर ६५९ ५६८८ १२,७६६३५५८

ढोले पाटील रोड ३११ २६९२ ५२७२ १४७१

हडपसर / मुंढवा १००९ ८७५१ २१८८० ५७७७

कसबा पेठ विश्रामबाग ५७२ ४०८२ ७०४८ ११६१

कोंढवा-येवलेवाडी ३७० ३९१० ८२९४ १८९०

कोथरूड-बावधान ६५१ ४४७९ ११११६ ३५५५

नगररोड-वडगावशेरी ६९२ ७०६६ १५३७२ ४४९०

शिवाजीनगर-घोलेरोड २८८ २६९३ ६३३८ १२९७

सिंहगड रोड ६९२ ४८७४ १३,५८८३४६६

वानवडी-रामटेकडी २८७ २६९५ ६१५५ १२७८

वारजे-कर्वेनगर ७४२ ४६७९ १२५५७ ३३३२

येरवडा-धानोरी ३३८ ३२८६ ८४८२ २२४१

चौकट

शिस्तीला पर्याय नाही

“मे महिन्याच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहता सातत्याने ती घटताना दिसते. यातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचा निष्कर्ष नक्की काढता येईल. मात्र अशावेळी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हे आपल्याला जरूरी आहे.”

-डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे मनपा

चौकट

अन्य जिल्ह्याचा ताण...

शहरातील रुग्णसंख्या वेगाने घसरत असल्याचे समाधानकारक चित्र असले तरी अन्य जिल्ह्यातून अथवा लगतच्या जिल्ह्यातून गंभीर रुग्ण उपचारासाठी येण्याचे प्रमाण जास्त आहे. आजमितीला शहरात साधारणत: ४० टक्के रुग्ण हे जिल्ह्यातील तथा बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. स्थानिक स्तरावर रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यावर त्याला पुण्यात आणण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा अन्य जिल्ह्यांमधल्या, शहराबाहेरच्या गंभीर रुग्णांसाठी सध्या आयसीयू व व्हेंटिलेटर खाटा जास्त प्रमाणात लागत असल्याचे सूत्रांनी सप्ष्ट केले. त्यामुळे रुग्णसंख्या पंधरा हजारांच्या घरात आली असली तरी मृत्यूदर कायम आहे. शहरातील रोजच्या मृत्यूंमध्ये २५ टक्के मृत्यू पुण्याबाहेरील कोरोनाबाधितांचे आहेत.