महर्षि वाल्मिकीऋंशीच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या वाल्हे नगरीमध्ये, उन- पावसाच्या खेळात , भक्तिमय वातावरणात, दरवर्षी मोठ्या आनंदाने स्वागताला सज्ज असलेल्या वाल्हे नगरीत, आज रोजी आगमन होणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सलग दुसऱ्या वर्षीही दिसला नाही. त्यामुळे पालखीतळ दुसऱ्या वर्षीही सुना सुना दिसत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याने महर्षि वाल्मिकीऋशींच्या संजीवनी समाधी मंदिर परिसरा मधील वाल्हे नगरीमध्ये आज वैष्णवांच्या महाजनसागराविना, तसेच माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दुपारी होणारी समाज आरती, त्यानंतर वैष्णवांच्या महाप्रसादाच्या पंगती, नंतर भजनाच्या आनंदामध्ये रंगणारे वैष्णव आदी गोष्टींना यावर्षी वाल्हकेर मुकले आहेत.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन पहाटे सहाच्या सुमारास, टाळ मृदुंगाचा गजर, व हरिनामाच्या जयघोषामध्ये पालखी सोहळा दरवर्षी वाल्हे नगरीकडे मार्गस्थ होत होती. सकाळी अकराच्या दरम्यान वाल्मिकीच्या नगरीमध्ये माऊलींचे आगमन व्हायचे त्यानंतर वाल्हे गावमधील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या रथावरती पुष्पवृष्ठी करत स्वागत केले जायची . दुपारी बारा – साडेबारा पर्यंत पालखी सोहळा पालखी तळावरती पोचायची व अवघे तळ टाळ मृदुंगाच्या गजरात व वारकऱ्यांच्या गर्दीत हरवून जायचे.
——
चौकट
आर्थिक उत्पन्नवर परिणाम
पालखी सोहळा ज्या गावामधून मार्गस्थ होत असतो त्या गावांमधील अनेक व्यवसायिक पालखी सोहळ्याच्या दरम्यान मोठी आर्थिक उलाढाल करतात. अनेक व्यावसायिकांचे वार्षिक उत्पन्न पालखी सोहळा मार्गस्थ होत असतानाच दोन दिवसामध्ये वर्षभराचा आर्थिक व्यवसाय होतो. मात्र, कोरोनाच्या संकटामध्ये पालखी सोहळा रद्द झाल्याने अनेक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेकांची वर्षभराची आर्थिक गणिते बिघडली आहेत.
—
फोटो १ ०८ वाल्ल्हे 1वाल्हे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावरील दोन वर्षा पुर्वीचा समाज आरती च्या वेळी जमलेला प्रचंड वैष्णवांचा मेळा.
फोटो 2 वाल्हे : वाल्हे येथील येथिल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ वैष्णवा विना सुना सुना दिसत आहे