शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

धर्मनिरपेक्षता आयात केलेली नाही

By admin | Published: March 24, 2017 4:20 AM

‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द पाश्चात्त्य विचारसरणीतून आला आहे, हा समज चुकीचा आहे.

पुणे : ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द पाश्चात्त्य विचारसरणीतून आला आहे, हा समज चुकीचा आहे. साडेतीन हजार वर्षांपूर्वी ॠग्वेदात धर्मनिरपेक्षतेसाठी ‘बहुविविधता’ हा शब्द रूढ होता, भारतीय संस्कृतीतच या शब्दाची मूळं रुजलेली आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही हे शब्द आपण कुठूनही आयात केलेले नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे माजी खासदार आणि पुरोगामी विचारवंत आरिफ महंमद खान यांनी धर्माचे राजकारण करणाऱ्यांवर टीका केली. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त अल्मास शेख, तबस्सुम इनामदार, शमीम मडकी, सायराबानो शेख, दिलशाद मुजावर यांचा सत्यशोधक फातिमाबी शेख स्मृतिगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकार राज काझी यांना स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार देण्यात आला. त्या वेळी खान बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेंटर फॉर प्रमोशन आॅफ डेमॉक्रसी अँड सेक्युलॅरिझमचे अध्यक्ष प्रा. जहीर अली, भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या संस्थापिका जाकिया सोमण, स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. नूर जहीर, प्रा. शमशुद्दीन तांबोळी उपस्थित होते. आरिफ खान म्हणाले, कुराणात ‘अवामून’ या शब्दाचा अर्थ हा समानतेशीच निगडित आहे, मात्र कुराणात स्त्री आणि पुरुष दोघांच्या भूमिका निश्चित केलेल्या आहेत. तिची जबाबदारी ही घर चालविणे नाही, तर ती पुरुषांचीच आहे. सीमेवर लढायला महिलांना पाठवणार का? पण महिला पायलट विमानातून बाँब नक्कीच फेकू शकतात. ही असमानता मानली जाणार का? प्रत्येक धर्म आपली विचारसरणी पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहे, मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुस्तकाच्या माध्यमातून ती मांडली तर बिघडले कुठे? अशी दुटप्पी वृत्ती असू नये. राजकारण्यांना नागरिकांची मते नको आहेत तर समाजाची मते हवी आहेत. कारण नागरिकांची मते मिळवण्यासाठी काम लागते. धर्माची मते मिळविण्यासाठी केवळ भीती निर्माण करावी लागते. शहाबानो प्रकरणात सांप्रदायिकतेला सन्मान मिळाल्यानेच मी खासदारकीचा राजीनामा दिली असल्याची टिप्पणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)