पुणे : महापालिकेची सुरक्षाव्यवस्था अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने आता मंत्रालयाच्या धर्तीवर पालिकेच्या मुख्य इमारतीत विशेष सुरक्षाव्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यात पालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकापासून ते पालिकेचे कर्मचारी, नगरसेवक, तसेच इतर कार्यालयातील कर्मचारी यांना बायोमेट्रिक्स बंधनकारक करण्यात येणार आहे. या शिवाय पालिकेत येणाऱ्या प्रत्येक वाहनाचीही विशेष संगणक प्रणालीद्वारे नोंद ठेवली जाणार आहे. या विशेष सुरक्षाव्यवस्थाचे सादरीकरण शनिवारी महापालिका प्रशासनास करण्यात आले. या प्रणालीस तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिकेच्या मुख्य भवनास दररोज सुमारे तीन ते साडेतीन हजार नागरिक वेगवेगळ्या कारणास्तव भेट देतात. तर, सुमारे सात ते आठ हजार कर्मचारी मुख्य इमारतीत विभागात काम करतात. तर, शेकडो वाहने महापालिकेच्या इमारतीच्या आत, तसेच बाहेरील परिसरात पार्किंग केली जातात. यावर नियंत्रणासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था लावण्यात आलेली असली, तरी या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची अथवा वाहनांची नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे घातपाताची अथवा गैरप्रकाराची शक्यता नाकारता येत नाही. तर, गेल्या काही वर्षांत आंदोलन अथवा मोर्चेही थेट पालिकेच्या इमारतीत घुसत असल्याने सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडून मुख्य भवनात मंत्रालयाच्या धर्तीवर अत्याधिनिक सुरक्षाव्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)प्रत्येकाला आरएफआयडी कार्ड या सुरक्षे यंत्रणेअंतर्गत मंत्रालयाच्या धर्तीवर पालिका भवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरएफआयडी ( रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंंिटफिकेशन डिव्हाईस) असलेले कार्ड प्रवेशद्वारातच देण्यात येईल. हे कार्ड देताना, संबंधित व्यक्तीच्या बोटांच्या ठशांची बायोमेट्रिक नोंद, फोटो, कोणत्या विभागात कोणाकडे काम आहे, याची नोंद करून घेतली जाईल. त्यानंतर मुख्य इमारतीच्या आत प्रवेश दिला जाईल. त्यानंतर हे कार्ड असेल, तरच मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात बसविण्यात आलेल्या आॅटोमेटिक बॅरिकेडमधून संबंधित व्यक्तीस आत जाता येईल. हीच प्रक्रिया बाहेर येतानाही असेल. या व्यक्तीस बाहेर जाताना हे कार्ड बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वारावर जमा करावे लागेल. हे कार्ड महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी, नगरसेवक, तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र असणार आहेत. तसेच तात्पुरत्या स्वरूपात येणाऱ्या नागरिकांसाठीही स्वतंत्र असणार आहेत. वाहनांसाठी स्वतंत्र स्वयंचलित बँरिकेड महापालिकेत येणाऱ्या वाहनांसाठीही आॅटोमेटिक बॅरिकेड असणार आहे. नगरसेवक, अधिकारी आणि नियमित महापालिकेत येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना विशेष बारकोड असलेली यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित बारकोड असलेल्या वाहनांनाच पालिकेच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. त्या वाहनांसाठी विशेष व्यवस्था ठेवली जाईल.
महापालिकेला मंत्रालयाच्या धर्तीवर ‘सुरक्षा कवच’
By admin | Published: June 21, 2015 12:25 AM