पुणे : लोहगाव विमानतळावरील एअरफोर्सच्या सुरक्षारक्षकाच्या डबल बोअर रायफलमधून अनवधानाने छऱ्याची गोळी उडाल्याने त्याच्या पोटाला व पायाला दुखापत झाली. बुधवारी सकाळी टेक्निकल एअरपोर्ट धावपट्टीजवळ हा अपघात झाला.विमानाच्या उड्डाणाच्यावेळी पक्षी अडथळा करू नयेत यासाठी या डबल बोर रायफलचा वापर केला जातो. त्याला उपचारासाठी कमांड हॉस्पिटल येथे दाखल केल्याचे समजते. मात्र याची कोणतीही नोंद विमानतळ पोलिसांकडे देण्यात आलेली नाही. विमानपतन कार्यालयाच्या आवारात हा अपघात घडला असून संबधित सुरक्षारक्षक यात किरकोळ जखमी झाला आहे. त्याला तत्काळ उपचारासाठी कंमाड रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेतील जखमी सुरक्षा कर्मचाऱ्याचे नाव समजू शकले नाही. जखमी सुरक्षा कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असून कोणताही घातापाताचा किंवा अन्य प्रकार नाही, हा अनवधानाने झालेला अपघात असल्याचे विमानपतन अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोहगाव विमानतळावरील सुरक्षारक्षकाच्या पायाला लागली सर्व्हिस रिव्हॉल्व्हरची गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:42 PM
लोहगाव विमानतळावरील एअरफोर्सच्या सुरक्षारक्षकाच्या डबल बोअर रायफलमधून अनवधानाने छऱ्याची गोळी उडाल्याने त्याच्या पोटाला व पायाला दुखापत झाली.
ठळक मुद्देडबल बोअर रायफलमधून छऱ्याची गोळी उडाल्याने सुरक्षारक्षकाच्या पोटाला व पायाला दुखापतहा अनवधानाने झालेला अपघात : विमानपतन अधिकारी