प्रत्येक व्यक्तीची माहिती ठेवणारपुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात येणाºया समाजकंटकांवर, चोरट्यांवर आणि बेकायदेशीर कृत्य करणाºयांवर नजर ठेवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने बंदूकधारी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. काही दिवसांपासून विद्यापीठ आवारात २४ तास हे बंदूकधारी गस्त घालत आहेत. त्याचप्रमाणे पुढील काही महिन्यांत परिसरात ५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. तसेच विद्यापीठात जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी स्वतंत्र गेट बांधण्याचे काम लवकरच सुरू करणार आहे. त्यामुळे उशिरा का होईना विद्यापीठाने आपली सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी लक्ष दिल्याचे बोलले जात आहे.विद्यापीठाच्या सुमारे ४११ एकरांच्या परिसरात काही ठिकाणी घनदाट झाडी आहे. गेल्या काही महिन्यांतच विद्यापीठ आवारात एका अज्ञात व्यक्तीने एका तरूणावर व तरूणीवर टोकदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली होती. तसेच विद्यापीठातील वसतिगृहात मद्यपान करून काही तरूणांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बंदूकधारी पथकाची नियुक्ती केली असून या पथाकाकडून २४ तास विद्यापीठात गस्त घातली जात आहे. या पथकामध्ये एका महिला सुरक्षारक्षकही असणार आहे. विद्यापीठात महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ४० नवीन सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले की, विद्यापीठात विविध विभागांच्या आवारात, तसेच परिसरातील रस्त्यांवर सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आता फायबर आॅप्टिकल नेटवर्कच्या माध्यातून विद्यापीठात सेंट्रल कमांड कंट्रोल स्टेशन उभारले जाणार आहे. सुमारे ५०० नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून विद्यापीठातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच सुरक्षा कर्मचाºयांना लवकरच व्हिडीओ फोन देण्यात येतील. विद्यापीठाकडून सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जाणार आहे.........४विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणखी एक गेट तयार केले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र गेट आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र गेट असेल. ४पुढील सहा महिन्यांपर्यंत हे काम पूर्ण होईल. तसेच, विद्यापीठातील प्रवेशासाठी आरएफआयडी कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठात येणार व्यक्ती किती तास विद्यापीठात आला व किती तासांनी विद्यापीठाबाहेर गेला. हे समजू शकणार आहे, असेही प्रफुल्ल पवार यांनी सांगितले..........
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता बंदूकधारी सुरक्षारक्षकांची गस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:31 PM
जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी स्वतंत्र गेट बांधणार
ठळक मुद्देविद्यापीठात ५०० सीसीटीव्ही बसवणारप्रत्येक व्यक्तीची माहिती ठेवणार