पुरंदर तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा-शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या ६ प्रभागांतील १७ जागांसाठी निवडणुकीच्या रणांगणात आता ३९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. शुक्रवारी होत असलेल्या मतदानची पूर्व तयारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. मात्र, मतदान कक्षाच्या दारे-खिडक्यांची दुरवस्था झाली असून, कर्माचारी व मतदान साहित्याची सुरक्षा रामभरोस असल्याचे चित्र आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य व कर्मचारी आज गुरुवारी सायंकाळी दाखल झाले आहेत. नीरा-शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी रयत शिक्षण संकुलनात १० वर्गखोल्या व ज्युबिलंट इंग्लिश स्कूलमध्ये २ वर्गखोल्यांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. सहा प्रभागांसाठी बारा वर्ग खोल्यांमध्ये मतदानची प्रक्रिय पार पडणार आहे. ६० निवडणूक कर्मचारी व १२ पोलीस सुरक्षेचे काम करणार आहेत.
पुणे जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर उमेदवार असलेल्या व ८ हजार ६२० मतदारसंख्या असलेल्या नीरा-शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी होत असलेल्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असले, तरी आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचारी मुक्कामी आले असता रयत शिक्षण संस्थेच्या वर्गखोल्यांची अवस्थ समोर आली.
--
फोटो क्रमांक : १४नीरा मतदान केंद्र
फोटोओळ :- नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रातील दारांची व खिडक्यांची असलेली दुर्दशा.