पुणे : गेली अनेक वर्षे काही अधिकारी व काही ठेकेदार कंपन्या यांच्या संगनमतातून होणारी सुरक्षारक्षकांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने विविध ठेकेदार कंपन्यांकडून घेतलेल्या तब्बल ९०० सुरक्षारक्षकांना नव्याने नियुक्ती देण्याचे नाकारले असून आवश्यक असणारे सर्व सुरक्षारक्षक आता जिल्हा सुरक्षारक्षक महामंडळाकडून घेण्याचे ठरवले असल्याचे समजते.कंत्राटी कामगार असलेल्या सर्व सुरक्षारक्षकांना बुधवारी दुपारी महापालिकेत बोलावण्यात आले व यावर्षीच्या अंदाजपत्रकात सुरक्षारक्षकांच्या वेतनासाठी तरतूद नाही, त्यामुळे तुमचे वेतन देता येणार नाही, या कारणावरून सेवा ब्रेक करीत असल्याचे सांगण्यात आले. धक्का बसलेल्या सुरक्षारक्षकांनी लगेचच महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी महापालिका कंत्राटी कामगार युनियनचे पदाधिकारी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर तसेच मुकुंद काकडे, लखन बिबवे, गिरीश क्षीरसागर आदींशीही संपर्क साधला.युनियनच्या पदाधिकाºयांनी महापालिकेत येऊन लगेचच पदाधिकाºयांबरोबर चर्चा केली. मात्र याबाबत काहीच तोडगा निघालेला नाही. अंदाजपत्रकात तरतूद नसल्यामुळे या सुरक्षारक्षकांना तीन महिन्यांचे वेतनही मिळालेले नाही. कंत्राटी कामगार म्हणून हे सर्व सुरक्षारक्षक ठेकेदारांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे महापालिकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करीत आहेत.त्यांच्यावर अशा प्रकारे बेकारीची कुºहाड टाकणे अन्यायकारक आहे. त्यामुळे त्यांनी सेवा खंडित करू नये, अशी मागणी करणारे निवेदन कंत्राटी कामगार युनियनच्या वतीने महापालिका आयुक्त तसेच पदाधिकाºयांना देण्यात आले.
सुरक्षारक्षकांची सेवा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 3:17 AM