शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 2:56 AM

देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आपले धोरण असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पुणे : देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आपले धोरण असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पोलीस परिषदेत शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले़ पाषाण रस्त्यावरील ‘आयसर’च्या (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधनसंस्था) आवारात देशांतर्गत सुरक्षेवर तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशांतर्गत सुरक्षेवर या परिषदेत चर्चा केली जात आहे़ गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते़ या परिषदेचा मुख्य विषय न्यायवैद्यकीय तपास आणि शास्त्रीय तपास असा आहे. शनिवारी पहिल्या सत्रात पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील पोलीस महासंचालक तसेच तपास यंत्रणातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.तंत्रज्ञानातील बदल, त्याअनुंषगाने होणारा तपास, देशांतर्गत सुरक्षा तसेच दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया या विषयांवर मोदी यांनी

उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. सीमेपलीकडील शत्रूकडून देशाअंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्यात येत आहे. देशांतर्गत सुरक्षेबाबत तडजोड केली जाणार नसून आपल्या देशातील तपास यंत्रणा बाह्यआक्रमणे तसेच छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास सक्षम असल्याचे मोदी म्हणाले. शनिवारी दिवसभर या परिषदेतील व्याख्याने मोदींनी लक्षपूर्वक ऐकली़तीन दिवसांच्या परिषदेची सांगता रविवारी होईल. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अरविंद कुमार यांच्यासह १८० पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी परिषदेत सहभागी झाले आहेत.

राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी यावेळी संवाद साधला. लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव, नाईक नंदकुमार चावरे, सुभेदार संजय कुमार मोहिते, एनसीसी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी हे ‘फिटनेस’लाही तितकेच महत्त्व देतात. दिल्लीसह देशातील कोणत्याही राज्यात किंवा परदेश दौºयातही ते योगा व व्यायाम करण्यास विसरत नाहीत. ते शुक्रवारी पुण्यात मुक्कामी आले. त्यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे योगा, ध्यानधारणा व हलकासा व्यायाम करण्यास प्राधान्य दिले. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही योगासने केली. मोदी यांनी अधिकाºयांना योगाचे महत्त्व पटवून दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणे