कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत उत्तम बियाण्याची निवड करणे, योग्य बीजप्रक्रिया करून चांगले उत्पन्न मिळविणे व बियांचे किडींपासून संरक्षण करणे यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची आहे, याबाबत माहिती कृषी मंडल अधिकारी प्रमोद बनकर यांनी दिली.
बीज प्रक्रियामुळे होणारे फायदे याची माहिती देऊन ब्रिज प्रक्रिया ही खर्चिक नसल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक श्रीमती पी. एम. गभाले यांनी दिली. या कार्यक्रमास नारायणगावचे प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर कोल्हे, अनिता कोल्हे, विविध महिला शेतकरी बचत गटाचे शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी सहायक पी. व्ही. अडागळे यांनी केले.
फोटो ओळ : कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत कृषी विभागाकडून नारायणगाव येथे बीज प्रक्रिया उपक्रमाची माहिती देताना नारायणगावचे मंडल कृषी अधिकारी प्रमोद बनकर.