शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

स्वीकृत सदस्यपदी शिक्कामोर्तब

By admin | Published: April 26, 2017 4:15 AM

स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून झालेला राडा, उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आणि सदस्यांच्या अर्हतेवर घेतलेला

पुणे : स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून झालेला राडा, उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आणि सदस्यांच्या अर्हतेवर घेतलेला आक्षेप या सर्व गोंधळानंतर अखेर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी ५ सदस्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपाच्या वतीने गणेश बिडकर, गोपाळ चिंतल, रघुनाथ गौडा यांची तर राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने सुभाष जगताप आणि काँगे्रसचे अजित दरेकर यांना सभागृहात येण्याची संधी मिळाली आहे.महापालिकेच्या वतीने मंगळवारी (दि. २५) घेण्यात आलेल्या खास सभेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीला मान्यता देण्याचा विषय ठेवण्यात आला. हा विषय आल्यानंतर शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी स्वीकृत नगरसेवक प्रकरणी उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केला; तसेच त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी दिलेला अहवाल सभागृहात सादर करण्याची मागणी केली. याबाबत प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप यांनी धर्मादाय आयुक्तांकडून आलेल्या अहवालाचे वाचन करण्यास सांगितले. यामध्ये २१ एप्रिल रोजी दिलेल्या अहवालात काँगे्रसचे अजित दरेकर, भाजपाचे गणेश बिडकर आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे सुभाष जगताप संंबंधित संस्थेचे पदाधिकारी नसल्याचा अभिप्राय दिला होता; परंतु या संस्थांनी दिलेल्या चेज रिपोर्टची तपासणी न करताच हा अहवाल देण्यात आल्याने पुन्हा २४ एप्रिल रोजी दुसरा अभिप्राय घेण्यात आला. याबाबत भोसले यांनी अक्षेप घेत अहवालामध्ये अनियमितता झाली असून, त्याची चौकशी करण्याची मागणी केली. भोसले यांच्या आरोपावर काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी हरकत घेऊन निवडीला मंजुरी देण्याची मागणी केली.स्पष्टीकरण देताना जगताप यांनी सांगितले, की शिवसेनेचे उमेदवार योगेश मोकाटे यांनी छाननीच्या वेळी उपस्थित राहण्याची मागणी केली. त्यानुसार सर्वच उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यत्वाबद्दल खातरजमा करून घेण्यासाठी धर्मादाय आयुक्तांना लेखी पत्र देण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्राथमिक अहवाल पाठविला; परंतु त्यामध्ये त्रुटी असल्याने पुन्हा सविस्तर अहवाल मागविणयत आला. तो अहवाल सोमवारी (दि. २४) मिळाला असून, त्यात सर्व उमेदवारांनी दिलेली संस्थांची माहिती व पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पदाधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला व सभेने मंजुरी दिली.पाचही स्वीकृत नगरसेवकांचा महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)