सुनील रूपराव पवार (वय २०), आकाश सर्जेराव पवार (वय २०), विशाल कैलास मोहिते (वय १८), प्रकाश सर्जेराव पवार (वय १८ सर्व राहणार टाकरखेड ता. चिखली, जि. बुलढाणा) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .
याप्रकरणी शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी दि. २६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत न्हावरा गावच्या हद्दीत साखर कारखाना ते आलेगावपागा रोडवर उत्तरेस एका पालीमध्ये गांजी विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पडवळकर, पोलीस हवालदार संतोष साठे, मुंकुद कुडेकर, इब्राहिम शेख, संतोष साळुंके, प्रशांत खुटेमाटे, शीतल गवळी यांच्या पथकाने काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी नायब तहसीलदार यादव व पंचासह छापा टाकला. त्यावेळी त्यांना दोन गोणीमध्ये खाकी कागदात व प्लास्टिक कागदात गांजी असलेले ७८ किलो वजनाचे ३५ पुडे किंमत सुमारे १६ लाख ३८ हजार रुपये असलेले आढळुन आले. त्या वेळी यातील चार आरोपींना ताब्यात घेऊन माल जप्त केला. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत खुटेमाटे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहेत.