कोरोना रुग्णांचा चढता आलेख लक्षात घेऊन विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.यावेळी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.निखिल मगदूम, पोलीस हवालदार भगीरथ घुले,कुंडलिक माने, संतोष दावलकर ,अजित माने, महेश खरात, होमगार्ड संजय काळे व देवेंद्र बांदल यांनी ही कारवाई केली. आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अन्यथा घरीच थांबावे अशा सूचना राजगड पोलीस ठाण्याकडून ध्वनिक्षेपकावरून देण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही नागरिक सर्रासपणे या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. खेड शिवापूर,नसरापूर, कापूरहोळ, किकवी व सारोळा बाजारातील गर्दी अद्याप ओसरलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.
राजगड च्या कार्यक्षेत्रातील नसरापूर,खेड शिवापूर, वेळू, शिंदेवाडी,टोल नाका, कापूरव्होल, किकवी, सारोळा व पुणे सातारा महामार्गावर आदी महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. खेड शिवापर टोल नाका व सारोळा येथे महामार्गावर तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.तर अनेक ठिकाणी थेट वाहनेच जप्त करण्यात आली आहेत.
नसरापूर(ता.भोर) येथे राजगड पोलिसांनी मुक्त संचार करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करून वाहने जप्त केली आहेत.