संबंधित विधवा ही मुंबईतील अंधेरी येथे राहते. तिची सय्यदनगर सर्व्हे क्रमांक ७५ मध्ये जागा आहे. मेहबूब याने संबंधित जागेचे साथीदारांसह बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर जागेचा ताबा घेत पत्राशेड उभारत ते बांगलादेशी नागरिकांना भाड्याने दिले. या महिलेस त्याने सय्यदनगर आणि मुंबई येथे जात वारंवार जिवे ठार मारण्याची धमकी दिली. संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मेहबूबवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी या अर्जास विरोध केला. पोलिसांनी या प्रकरणाचे कागदोपत्री पुरावे जमा केले आहेत. हा गुन्हा शिक्षेस पात्र आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन तपास करणे गरजेचे आहे, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने मेहबूब यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला.
विधवेची जमीन बळकावली; आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:13 AM