याप्रसंगी तालुकाध्यक्ष विजय डोळस, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जमीरभाई काझी,जेष्ठ नेते भास्कर तुळवे, किसान सेल अध्यक्ष चंद्रकांत गोरे, चाकण शहराध्यक्ष आनंद गायकवाड, जिल्हा काँग्रेस प्रवक्ते नीलेश कड पाटील, जाहीर अन्सारी, दीपक थिगळे, सुभाष गाढवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षनिरीक्षकांनी सांगितले की, लवकरच प्रत्येक प्रभागनिहाय आढावा घेऊन उमेदवारांना थेट प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्तरावरून ताकद देण्यात येईल. जनतेच्या कामासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देण्यात येणार असून काँग्रेस पक्ष जनतेच्या आशा व आकांक्षा पूर्ण करू शकतो, हेदेखील त्यांनी नमूद केले.
या वेळी काही इच्छुकांनी आपले विचार निरीक्षकांसमोर व्यक्त केले. खेड तालुका पदाधिकारी यांची प्रदेशाध्यक्ष यांच्याबरोबर बैठक घेण्यात येणार आहे, असेदेखील निरीक्षक यांनी नमूद केले.
खेड तालुका काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीला उपस्थित मान्यवर.