शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

१० जानेवारीला सासवडमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:57 IST

महिला कुस्तीपटूंनी ३ जानेवारीपर्यंत संपर्क करावा

सासवड :महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ साठी पुरंदर तालुक्यातून मल्लांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शुक्रवारी (दि. १०) सासवड (ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव रवींद्र जगताप यांनी दिली. दि. १८ व १९ जानेवारी रोजी कोंढवा बुद्रुक (पुणे) येथे जिल्हास्तरावरील निवड चाचणी स्पर्धा होणार असून, त्यापूर्वी तालुक्यातून निवड चाचणी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.निवड चाचणी स्पर्धेच्या नियोजनाबाबत तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सदस्यांची सासवड येथे बैठक झाली. याप्रसंगी जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पहिलवान राजेंद्र जगताप, सदस्य अशोक झेंडे, उपाध्यक्ष पै. पांडुरंग कामथे, सदस्य पै. तात्या झेंडे, पै. संतोष सोनवणे, पै. विनोद जगताप, पै. बाळासाहेब कोलते, पै. गुलाब गायकवाड, पै. रमेश जगताप, पै. चंद्रकांत गिरमे, पै. रघुनाथ जगताप, छत्रपती शिवाजी कुस्ती संकुलाचे व्यवस्थापक पै. माउली खोपडे, पै. तानाजी जाधव उपस्थित होते.वरिष्ठ आणि बालगटात या निवड स्पर्धा होणार आहेत. बालगटातील कुस्तीला चालना देण्यासाठी यावर्षीपासून पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत बालगटात जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचा समावेश होणार आहे. दि. १० जानेवारीला सकाळी ९ ते १० या वेळेत स्पर्धकांची वजने घेतली जाणार असून, माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते ११व्या स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. दु. १२ पासून रात्री ९ पर्यंत या निवड चाचणी स्पर्धा होणार आहेत. बालगटातील स्पर्धा गादी विभागात, तर वरिष्ठ गटातील स्पर्धा गादी आणि माती विभागात वजन गटनिहाय होणार आहेत.स्पर्धेसाठी वजनगट पुढीलप्रमाणे -बालगट - २५ किलो, २८ किलो, ३२ किलो, ३६ किलो, ४० किलो, ४४ किलो, ४८ किलो, ५१ किलो, ५५ किलो आणि ६० किलो. बालगटासाठी जन्मतारीख १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत असावी. वयाचा पुरावा म्हणून ओरिजनल आधार कार्ड किंवा पासपोर्ट देणे बंधनकारक आहे. सहभागी होणाऱ्या मल्लांची जिल्हा कुस्तीगीर संघाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. नसल्यास जिल्हा कुस्तीगीर संघाकडे अर्ज व रजिस्ट्रेशन फी भरून नोंदणी करता येईल.वरिष्ठ गट- गादी व माती विभाग- ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७० किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो आणि ९७ किलो. महाराष्ट्र केसरी किताब गट ८६ ते १२५ किलो.महिला गट :- ५० किलो, ५३ किलो, ५५ किलो, ५७ किलो, ५९ किलो, ६२ किलो, ६५ किलो, ६८ किलो, ७२ किलो वजनगट असून, महाराष्ट्र केसरी गटासाठी ६५ ते ७६ किलो वजनगट राहणार आहे. महिला कुस्तीपटूंनी ३ जानेवारीपर्यंत संपर्क करावावरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी किताब २०२४-२५ साठी दि. ४ जानेवारी रोजी लोणीकंद ( ता. हवेली) येथील जाणता राजा कुस्ती केंद्रात होणार असल्याने पुरंदर तालुक्यातून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी (दि. ३) जानेवारीपर्यंत सासवड येथील श्री शिवाजी कुस्ती संकुल येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेसाठी स्पर्धकांची जन्मतारीख २००४ व त्यापूर्वी असावी, तर २००५ किंवा २००६ मध्ये जन्मलेले स्पर्धक वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पालकांचे संमतीपत्रक घेऊन स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा