२७ व २८ फेब्रुवारी रोजी लोणीकंद येथील जाणता राजा कुस्ती संकुलात जिल्ह्यातील मल्लांच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा होणार आहेत.
यावेळी महाबली हनुमानाच्या प्रतिमेचे तसेच आखाड्याचे पूजन उद्योजक राकेश कंद, चंद्रशेखर जगताप, रोहित इनामके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे राजेंद्र जगताप, तालुका कुस्तीगीर संघाचे भगवान म्हेत्रे यांचे हस्ते करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय पंच तुषार गोळे यांनी परिक्षण केले. गटनिहाय विजेते पुढील प्रमाणे : गादी विभाग-ः ५७ किलो - संग्राम जगताप, ६१ किलो - विजय भांडवलकर, ६५ किलो - आतिष भांडवलकर, ७० किलो : प्रसाद जगदाळे, ७४ किलो - विराज बाठे, ७९ किलो : अक्षय कामथे, ८६ किलो : प्रतीक जगताप, ९२ किलो : दत्ता तोरवे, ९६ किलो : अबिद आतार आणि खुला गट: प्रतीक जगदाळे.
माती विभाग - ५७ किलो : मयुर लगस, ६१ किलो :ः पांडुरंग महानवर, ६५ किलो ःकाळदरी तुषार ससाणे, ७० किलो - अक्षय झिंजुरके, ७४ किलो - ऋषिकेश शिंदे, ७९ किलो - ओंकार गिते, ८६ किलो - अमोल भांडवलकर, ९२ किलो : ः शाहबाज बागवान, ९६ किलो : वैभव गायकवाड आणि खुला गट : धिरज भांडवलकर. यावेळी उपाध्यक्ष विनोद जगताप, सचिव रविंद्रपंत जगताप, बाळासाहेब कोलते, गुलाबराव गायकवाड, संतोष सोनवणे, अशोक झेंडे, तात्या झेेंडे, शरद जगदाळे, छगन दिघे, प्रशिक्षक माऊली खोपडे, रघुनाथ जगताप, पोपटराव जगताप, प्रकाश जगताप, रणजित जगताप, माध्यमिक शिक्षक संघााचे रामप्रभू पेटकर, तालुका क्रीडा संघाचे प्रल्हाद कारकर, संभाजी शिंदे, विलास जोरी, रामदास जगताप, सोमनाथ उबाळे, मोहन नातू, शिवाजी गोडसे आदी उपस्थित होते.
- सासवड (ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी व्यायाम मंदिरात महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धेप्रसंगी.