मिळालेल्या कर्जातून स्वत:साठी व्यवसाय उभारावा, असे प्रतिपादन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी केले.
वेल्हे तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कक्ष वेल्हे येथील १५ समूह गटांना बॅंक आॅफ महाराष्ट्र वेल्हे यांचेकडून कर्जाचे वाटप करण्यात आले.
या वेळी श्रीकांत कारेगावकर बोलत होते. या वेळी आर्थिक समावेशनचे जिल्हा समन्वयक सरडे, बँक आॅफ महाराष्ट्र शाखा वेल्हेचे व्यवस्थापक कालीचरण सोनवणे, विश्वजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, सभापती दिनकर सरपाले, उपसभापती अनंता दारवटकर, पंचायत समिती सदस्या सीमा राऊत, उमेदच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक त्रिवेणी भोंडे, सोनाली अवचड, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, प्रभाग समन्वयक महम्मद शेतसंदी, भागवत ढगे, प्रेरिका, बँक सखी समूह गटातील महिला उपस्थित होत्या.
कारेगावकर म्हणाले की, वेल्हे तालुका हा अतिशय दुर्गम आणि डोंगरी असून या परिसरात कोणतेही
औद्योगिक क्षेत्र नाही. त्यामुळे समूहातील महिलांना व्यवसाय करण्याची चांगली संधी या ठिकाणी
निर्माण झाली आहे. गटातील महिलांनी आपला स्वत:चा व्यवसाय करावा व आपली आर्थिक प्रगती
करावी, असेही त्यांनी या वेळी सांगितले. सूत्रसंचालन महंमद शेतसंदी यांनी केले, तर आभार भागवत ढगे यांनी मानले.
१३ मार्गासनी
अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, अनंता दारवटकर यांच्या हस्ते समूह गटातील महिलांना कर्जाचे धनादेशाचे वाटप करण्यात आले.