शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
3
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
4
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
5
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
6
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
7
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
8
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
9
शेअर बाजारात सलग दुसऱ्या घसरणीसह सुरुवात; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये जोरदार विक्री
10
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
11
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
12
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
14
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
15
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
16
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
17
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
18
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
19
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
20
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?

पाण्याच्या भांड्यामधून दारुविक्री!; पिंपरखेड येथून दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 4:17 PM

पिंपरखेड (ता. शिरूर) येथील निमंत्रण हॉटेलवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चक्क पाण्यांच्या जारमध्ये दारू लपून ठेवलेली आढळून आली असून पोलीस उप निरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी स्कॉर्पिओ गाडीसह दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपोलीस उप निरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी स्कॉर्पिओ गाडीसह दोघांना घेतले ताब्यातकारवाईने अवैध दारू धंदे वाल्याचे दणाणले धाबे

टाकळी हाजी : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील निमंत्रण हॉटेलवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चक्क पाण्यांच्या जारमध्ये दारू लपून ठेवलेली आढळून आली असून पोलीस उप निरीक्षक एस. एस. वाघमोडे यांनी स्कॉर्पिओ गाडीसह दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी सांगितले, की आम्ही या ठिकाणी छापा मारला असता, हॉटेल समोर उभ्या असलेल्या स्कॉपिओ गाडीमध्ये पाण्याचे जार भांडे दिसले, त्यामध्ये विदेशी दारू ठेवलेली होती. ग्राहक आल्यानंतर त्यांना ती काढुन देण्यात येत होती. हा माल जप्त करीत, पोलिसांनी विशाल नामदेव दरेकर, अनिकेत बाळासाहेब पोखरकर दोघे (रा. पिंपरखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करून, ताब्यात घेतले. गाडी व विदेशी दारूसह सुमारे सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कोकरे हेही कारवाईत सहभागी झाले होते.वाघमोडे यांच्या कारवाईने अवैध दारू धंदे वाल्याचे धाबे दणाणले असून, या प्रकारची कारवाई चालू ठेवावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे. टाकळी हाजीमध्ये तर मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असून, जांबुत येथील धाब्यावर परमीट रुम सारखी दारू विक्री सुरू असते. समाजिक कार्यकते संजय पांचगे यांनी शिरूर तालुक्यात दारु बंदीसाठी मागील महिन्यात उपोषण केले होते. त्यांना वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दारू धंदे बंद करण्याचे आश्वासन दिले. मात्र, बेट भागात अद्यापही राजरोस अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे. यावर कधी कारवाई होणार, असा सवाल जनतेमधून केला जात आहे.

टॅग्स :Puneपुणे